लोणी विद्यालयात भरला तीस वर्षांनी माजी विद्यार्थी मेळावा. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 29, 2021

लोणी विद्यालयात भरला तीस वर्षांनी माजी विद्यार्थी मेळावा.

लोणी विद्यालयात भरला तीस वर्षांनी माजी विद्यार्थी मेळावा.
         वार्ताहर (कैलास गायकवाड )
लोणी-धामणी :  दि:२९/१२/२०२१. लोणी ( ता.आंबेगाव ) येथे श्री भैरवनाथ विद्या धाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या १९९०-९१ च्या वर्गाच्या माजी विद्यार्थ्याचा मेळावा (अर्थात गेट टुगेदर) संपन्न झाले.तब्बल तीस वर्षांनंतर दहावीचा वर्ग पुन्हा एकदा भरला.शाळेविषयी आणि गुरुजनांविषयी कमालीची कृतज्ञता व्यक्त करत हा दिवस म्हणजे आनंदसोहळाच ठरला.शाळेने दिलेल्या ज्ञानाच्या आणि संस्काराच्या शिदोरीने आज प्रत्येकजण आपापल्या जीवनात अतिशय आनंदात आहेत.शाळेविषयी मनात असलेला हा कृतज्ञभाव जागवत दहावीच्या या १९९०-९१ च्या बॅचने १,११,१११/- एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची भरघोस मदत शाळेच्या बांधकामासाठी दिलेली आहे.तसेच चैतन्य अन्नकेंद्रासाठी ११०००/- रुपयांची अन्य मदतही या विद्यार्थ्यानी दिलेली आहे.या आनंदमय स्नेहममेळाव्यासाठीvg माजी प्राचार्य स.ल.शिंदे यांचबरोबर अन्य गुरुजन आणि ४६ माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.अतिशय आनंदमय आणि भावविभोर वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. अशी माहिती निवृत्ती सिनलकर यांनी दिली. माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीच्या वतीने अध्यक्ष उदयसिंह वाळुंज पाटील यांनी मदतीचा धनादेश स्वीकारला. 

No comments:

Post a Comment