अजूनही समाजात माणुसकी जिवंत आहे,अर्थवट असलेल्या घरासाठी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दिले साहित्य... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 6, 2022

अजूनही समाजात माणुसकी जिवंत आहे,अर्थवट असलेल्या घरासाठी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दिले साहित्य...

अजूनही समाजात माणुसकी जिवंत आहे,अर्थवट असलेल्या घरासाठी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दिले साहित्य...                                                                                                            पणदरे(संतोष जाधव):- पणदरे ता.बारामती येथील सर्वांचे लाडके असे स्व.बबन भाऊ यानी आपलं अख्ख आयुष्य आपल्या स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेऊन समाज एकजूट करण्यासाठी अहो रात्र कष्ट केले,समाजावर जिथं जिथं अन्याय होईल तिथं खंबीरपणे उभे राहून जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत झटत राहणारे,कधीही कुठलीही अपेक्षा न ठेवणारे रामोशी समाजाचे जेष्ठ नेते कै.स्व.बबनराव आण्णा खोमणे यांच्या प्रथम स्मरणार्थ पणदरे येथील त्यांचे अर्धवट राहिलेले घर पुर्ण करण्यासाठी सासवड ता.पुरंदर येथिल जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते  गंगाराम जाधव सर यांनी घर बांधकामा साठी लागणारे साहित्य पत्रा,सिमेंट,चौकटी,खिडकी,दरवाजा,अँगल असे सर्व साहित्य एकुण रोख २५००० हजार रुपये चे आपल्या स्व खर्चातून भाऊंच्या पत्नी,मुले,याच्या उपस्थित त्यांच्या राहत्या घरी देण्यात आले.यावेळी जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष,तसेच युवक अध्यक्ष बहुजन हक्क परिषदचे पैलवान नानासाहेब मदने,राज्य महिला अध्यक्ष सुजाता जाधव,तालुका अध्यक्ष अलका भंडलकर,सुखदेव जाधव,विजय भंडलकर,इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बबन भाऊंच्या पत्नी व मुले यांनी जाधव सर यांचे मनापासून खुप खुप आभार मानले.

No comments:

Post a Comment