*दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना उपमाहिती कार्यालय व सा.कऱ्हावार्ता,पत्रकारांतर्फे अभिवादन*
*बारामती :-मराठीतील पहिल्या ‘दर्पण’ या वृत्तपत्राच्या आरंभ दिनानिमित्त प्रशासनातर्फे प्रशासकीय भवनातील उप माहिती कार्यालयात ‘पत्रकार दिन’तसेच ‘दर्पणदिन’ साजरा करण्यात आला. प्रारंभी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच श्री. कांबळे यांनी पत्रकारांसह सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास नायब तहसिलदार डॅा.भक्ती सरवदे- देवकाते यांच्यासह योगेश नालंदे, तानाजी पाथरकर, संदीप साबळे, राजेश वाघ, चेतन शिंदे,अभिजित कांबळे,राजू कांबळे,संतोष जाधव,स्वप्निल कांबळे, संतोष शिंदे, विलास कोकरे, शुभम अहिवळे, दशरथ मांढरे, निलेश जाधव तसेच उपविभागीय अधिकारी व उपमाहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. *साप्ताहिक क-हावार्ता कार्यालयात दर्पणकार जांभेकरांना अभिवादन* बारामतीतील गेल्या अडतीस वर्षापासून प्रसिद्ध होत असलेल्या साप्ताहिक क-हावार्ता आणि साप्ताहिक लोकवार्ता कार्यालयात दरवर्षी सर्व संपादक व पत्रकार एकत्रितपणे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करित आहेत.या वर्षी दत्ता महाडीक,शुभांगी महाडीक,संतोष जाधव,संतोष शिंदे,स्वप्निल कांबळे,फिरोज शेख,सुनिल शिंदे,राजू कांबळे, मन्सूर शेख,विराज शिंदे, दशरथ मांढरे,प्रेस फोटोग्राफर शाम शिंदे व अन्य उपस्थितांनी अभिवादन केले.यावेळी चहापानाचा कार्यक्रम होवून बारामती शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या निवास,पत्रकार भवनसह विविध समस्या व गरजा पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.परिसरातील दुकानदार बंधुभगिनींनी ही अभिवादन केले.
No comments:
Post a Comment