पुणे ग्रामीण विभागातील डाक कर्मचाऱ्यांचा सत्कार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, February 11, 2022

पुणे ग्रामीण विभागातील डाक कर्मचाऱ्यांचा सत्कार..

पुणे ग्रामीण विभागातील डाक कर्मचाऱ्यांचा सत्कार..
पुणे:- पुणे ग्रामीण विभागात चालू आर्थिक वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डाक कर्मचाऱ्याचा सत्कार पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक श्री बी पी एरंडे यांच्या हस्ते दि ११.०२.२०२२ रोजी शिवाजीनगर येथे पार पडला. पुणे ग्रामीण विभागाचा नवीन खातेवृद्धीमध्ये महाराष्ट्र सर्कल मध्ये प्रथम क्रमांक आला आहे तसेच सुकन्या समृद्धी योजनेत विभागामध्ये भरीव कामगिरी झालेली आहे.IPPB अंतर्गत CELC मध्ये सर्व नागरिकांना आता आधार-मोबाईल लिंकिंग प्रत्येक पोस्टमनच्या मोबाईल मध्ये ५ मिनिटात होते तसेच ५ वर्षांखालील बालकांचे अधारकार्ड सर्व पोस्टात विनामुल्य काढून मिळणार आहे तरी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन पुणे ग्रामीण विभाग अधीक्षक श्री बी पी एरंडे यांनी केले आहे.
सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात एकूण १०५ कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला गेला या कार्यक्रमास सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते त्यामध्ये मुख्यालय सहाय्यक अधीक्षक श्री एस आर साबळे ,सहाय्यक अधीक्षक श्री भूषण देशमुख , डाक निरीक्षक श्रीमती मानसी शर्मा , सहाय्यक अधीक्षक दक्षिण उपविभाग भोर श्री एस बी भंडारी, डाकनिरीक्षक सासवड श्री एम एस मेढे, डाकनिरीक्षक खेड श्री पी टी भोगाडे व सहाय्यक
अधीक्षक पश्चिम उपविभाग श्री जि एच वडूरकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment