श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी शरद वाळुंज पाटील उपाध्यक्षपदी राजेश सोनवणे
लोणी धामणी - (प्रतिनिधी -कैलास गायकवाड):-
ता.१२/४/२०२२ लोणी तालुका आंबेगाव. श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी वाळुंज नगर चे माजी सरपंच शरद शेठ वाळुंज आणि उपाध्यक्षपदी लोणी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश सोनवणे त्यांची निवड झाली. आठ विरुद्ध पाच असे मतदान झाले. विरोधकांना पाच मते पडली. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मुख्य बाजारपेठ असलेले लोणी गावची विकास सेवा संस्था, रानमळा वाळुंज नगर, लोणी या तीन गावचे मिळून असलेली विविध कार्यकारी सोसायटी या संस्थेची नुकतीच निवडणूक पार पडली. त्यामध्ये शिवशंभो शेतकरी सहकार पॅनेलचे आठ सदस्य निवडून आले. आठ ते दहा कोटी उलाढाल असलेली संस्था आहे. शिवशंभो शेतकरी सहकारी पॅनेल चे यांचे आठ सदस्य निवडून आले. अध्यक्षपदी शरद वाळुंज पाटील तर उपाध्यक्षपदी राजेश सोनवणे यांची निवड झाली.
No comments:
Post a Comment