श्री सोमेश्वर सेवकांची पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संदीप कदम यांची तर उपाध्यक्ष पदी संग्राम भोसले यांची बिनविरोध निवड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 12, 2022

श्री सोमेश्वर सेवकांची पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संदीप कदम यांची तर उपाध्यक्ष पदी संग्राम भोसले यांची बिनविरोध निवड..

श्री सोमेश्वर सेवकांची पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संदीप कदम यांची तर उपाध्यक्ष पदी संग्राम भोसले यांची बिनविरोध निवड..

सोमेश्वर नगर - प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली असून संस्थेच्या अध्यक्षपदी मुरूम येथील संदीप कदम सर यांची तर उपाध्यक्षपदी मांडकी येथील संग्राम भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे.
   सन २०२२-२७ या कालावधी साठी ही निवडणूक होती. अकरा जागेसाठी सतरा अर्ज दाखल झाले होते. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी दीपक जाधव सर, हेमंत गडकरी सर व चव्हाण जितेंद्र सर यांनी सामंजस्याची भूमिका घेत आपले अर्ज माघारी घेतल्याने बिनविरोध निवडणूक पार पडली.
     अध्यक्षपदाच्या निवडी साठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी संदीप कदम यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी संग्राम भोसले यांचा एकमेव अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा बारामतीचे सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे यांनी जाहीर केले.
    यावेळी माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अनिल भोसले, संचालक दीपक परकाळे, राजेंद्र मदने, बाळासो बालगुडे, शरद जगदाळे, मनोहर धुमाळ, झुरंगे सर, ललिता चव्हाण, कुलकर्णी मॅडम, सचिव अंकुश गायकवाड उपस्थित होते.
  निवडीनंतर बोलताना संदीप कदम म्हणाले की येणाऱ्या काळात संस्थेच्या नावलौकिक वाढेल असे काम करणार असून ठेवी वाढवणे व चांगला लाभांश देणार आहे. याशिवाय येणाऱ्या काळात कर्ज मर्यादा वाढवणार असून सभासद हिताच्या नवीन योजना राबवणार आहे.

No comments:

Post a Comment