स्वर्गीय सचिन (मामा )जाधव यांच्या स्मरणार्थ भव्य हाप पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 3, 2022

स्वर्गीय सचिन (मामा )जाधव यांच्या स्मरणार्थ भव्य हाप पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन..

स्वर्गीय सचिन (मामा )जाधव यांच्या स्मरणार्थ भव्य हाप पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन..
 लोणी धामणी- (प्रतिनिधी कैलास गायकवाड):- ता.३/४/२०२२ धामणी तालुका आंबेगाव.
 येथील सामाजिक कार्यकर्ते,स्व.सचिन (मामा) जाधव यांच्या स्मरणार्थ जाधव पाटील युवा मंच आयोजित भव्य हाफ पिच स्पर्धेचे,आज पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा.विवेकदादा वळसे पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले.* यावेळी उपस्थित असलेले तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भगवानराव वाघ, मा.अध्यक्ष अनिलशेठ वाळुंज, वामनराव जाधव, वसंतराव जाधव, धामणी कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सतिश जाधव पाटील, उद्योजक विजयराव जाधव, संदीपशेठ बोऱ्हाडे, आनंदराव जाधव, गुलाबराव वाघ, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस रामदास जाधव,अजित बोऱ्हाडे, सरपंच महेंद्र पोखरकर, संदीपशेठ पोखरकर, प्रतिक जाधव, रोहन जाधव, उपसरपंच मयुर सरडे, प्रमोद वाघ, साद इनामदार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment