तक्रार निवारण दिना मध्ये पोलीस स्टेशन स्तरावरील ११६ तक्रारीचे निवारण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 20, 2022

तक्रार निवारण दिना मध्ये पोलीस स्टेशन स्तरावरील ११६ तक्रारीचे निवारण..

तक्रार निवारण दिना मध्ये पोलीस स्टेशन स्तरावरील ११६ तक्रारीचे निवारण..
 आंबेगाव तालुका प्रति.(कैलास गायकवाड ):-ता.२०/४/२०२२रोजी आ योजित केलेल्या तक्रार दिनाच्या निमित्ताने आंबेगाव तालुक्यातील 
मंचर पोलीस स्टेशन हददीतील सर्व नागरीकांना मंचर पोलीस स्टेशनचे वतीने आव्हान करण्यात आले होते की, मंचर पोलीस स्टेशन येथे आपण केलेल्या तक्रारीचे अनुशंगाने त्याचे निवारण करणेसाठी मा. पोलीस अधिक्षक डाॅ.श्री. अभिनव देशमुख यांचे संकल्पनेतुन ‘‘तक्रार निवारण दिनाचे’’ आयोजन करण्यात आलेले असुन, ज्या तक्रारदार यांनी मंचर पोलीस स्टेशन येथे तसेच वरिष्ठ  कार्यालयात तक्रारी अर्ज केलेले आहेत. अशा सर्व अर्जदार आणि गैरअर्जदार यांनी दिनांक २०/४/२०२२रोजी सकाळी १०:००वा. मंचर पोलीस स्टेशन येथे हजर राहणेबाबत मंचर पोलीस स्टेशनचे वतीने कळविण्यात आले होते तरी सदर तक्रार निवारण दिनाच्या अनुषंगाने नागरिकांच्या एकूण ११६तक्रारीचे निराकरण करण्यात आले व त्याची निर्गती करण्यात आलेबाबत मंचर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सतिश होडगर यांनी माहिती दिली.

No comments:

Post a Comment