*तब्बल पाच महिन्यांनी झाले लालपरीचे आगमन*
पारगाव -प्रतिनिधी -पियुष गायकवाड :-ता.20/04/2022 ता. आंबेगाव
_धामणी येथे पुष्पगुच्छ देऊन चालक,वाहकाचा केला सत्कार_
गेली पाच महिन्यापासून बंद असलेली एस. टी आज अखेर धावताना पाहायला मिळली हळू हळू ग्रामीण भागात एस. टी चे दर्शन घडू लागल्याने ग्रामीण भागातील जनता आनंदी पाहायला मिळत आहे.
आज सकाळी धामणी मध्ये कवठे- पुणे या एस टी बस चे आगमन झाले.त्यावेळी चालक सदाशिव भालेराव आणि वाहक यांना शिरदाळे उपसरपंच श्री.मयुर सरडे आणि धामणी सोसायटी संचालक दिपक जाधव यांच्या हस्ते शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सोसायटी मा.चेअरमन निवृत्ती मिंडे,संचालक कोंडीभाऊ तांबे,सीताराम जाधव टेलर,गणेश रोकडे,अविनाश बोऱ्हाडे, मगण इनामदार, सदाशिव गाढवे, हरिभाऊ वायकर, किसन तांबे ,सुरेश पवार उपस्थित होते.
थोड्याच दिवसात सर्व एस. टी सेवा सुरळीत होणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करू असे चालक, वाहक यांनी सांगितले. जास्तीत जास्त ग्रामस्थांनी एस,टी ने सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन उपसरपंच मयुर सरडे आणि संचालक दिपक जाधव यांनी प्रवाशांना केले. या वेळी बरेच ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment