जीएसटी घोटाळ्याप्रकरणी खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाऱ्या एका व्यक्तीस अटक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 20, 2022

जीएसटी घोटाळ्याप्रकरणी खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाऱ्या एका व्यक्तीस अटक..

जीएसटी घोटाळ्याप्रकरणी खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाऱ्या एका व्यक्तीस अटक..                ठाणे:- सुमारे 58 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एका व्यक्तीस अटक
खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुध्द राज्य शासनाच्या वस्तु व सेवाकर विभागाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मे. ओम साई इंटरप्राईसेस या प्रकरणात अन्वेषण करण्यात आलेले आहे. या प्रकरणातील तपासणीदरम्यान असे लक्षात आले की, मे. ओम साई इंटरप्राईसेसचे मालक श्री. अनिल जाधव हे प्रत्यक्षात कोणत्याही वस्तु व सेवा यांचा प्रत्यक्ष पुरवठा करीत नाहीत. तर फक्त खोटी बिजके दत आहेत. सदर व्यक्तीच्या विवरण आणि बॅाक खाऱ्यांमधून रु.58 कोटींची बनावट तसेच बेहिशेबी उलाढाल दाखवून आणि 10.45 वस्तू व सेवा कर त्यांच्या प्राप्तकर्त्यांना स्थानांतरित करुन 10.45 कोटी रुपयांचा कर महसुलाची हानी केली आहे. अन्वेषणादरम्यान श्री. अनिल जाधव हे महसूल हानीमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे श्री. अनिल जाधव या व्यक्तीला महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरीसाठी दि.19.04.2022 रोजी अटक केली आहे. या व्यक्तीचे कृत्य हे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असून वस्तू व सेवा कर कायदा 2017 नुसार तुरुंगवासास पात्र आहे. या व्यक्तीला मा. मुख्य नायाधीश, ठाणे यांच्या न्यायालयाने दि.02.05.2022 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 
सदर प्रकरणात अन्वेषण अधिकारी श्री. प्रेमजीत रणनवरे (सहाय्यक राज्यकर आयुक्त) हे श्री. देवेंद्र शिंदे (राज्यकर उपायुक्त) यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. सदर कार्यवाहीसाठी श्री. महेंद्र काटकर (सहाय्यक राज्यकर आयुक्त) आणि श्री. तात्यासाहेब ढेरे (सहाय्यक राज्यकर आयुक्त) यांचा सक्रिय सहभाग आहे. सदर कार्यवाहीसाठी श्री. राजेंद्र मसराम (राज्यकर सह-आयुक्त) तसेच श्री. गोविंद बिलोलीकर (अतिरिक्त राज्यकर आयुक्त) यांचे विशेष मार्गदर्शन लाभेल.
अशी फसवेगिरीची प्रकरणे शोधुन त्यावर कार्यवाहीसाठी सर्वसमावेशक पृथ्थकरण साधनाचा वापरावर विशेष भर देण्यात येत आहे. अशा प्रकारच्या अटक कार्यवाहीद्वारे विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यक्तींना एकप्रकारे गंभीर इशारा दिलेला आहे.

No comments:

Post a Comment