देवीच्या मंदिरात माजी उपसरपंचासह तिघांनी केला प्राणघातक हल्ला.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, July 11, 2022

देवीच्या मंदिरात माजी उपसरपंचासह तिघांनी केला प्राणघातक हल्ला..

देवीच्या मंदिरात माजी उपसरपंचासह तिघांनी केला प्राणघातक हल्ला..
बारामती/माळेगाव:- नुकताच निवडणूका जाहीर झाल्या माळेगाव हे पूर्वी ग्रामपंचायत होतं आता नगरपालिका झालंय,नगरपालिका जाहीर झाल्यापासून अनेक राजकीय उलथापालथ झाली,गुन्हे घडले त्यातच भर म्हणून की काय आता नुकताच पाटलांचा नाद करतो या कारणावरून माळेगावच्या शिवनगर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाला. या प्रकरणी तिघांवर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींमध्ये एक माजी उपसरपंचही आहे.याबाबत माळेगांव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश उत्तमराव पैठणकर (वय ४६ रा.पैठणकरवस्ती शिवनगर माळेगांव बु) यांच्यावर १० जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता शिवनगर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात नितीन पाटील व सचिन पाटील यांच्या नादाला लागला म्हणून स्वप्निल ऊर्फ पिल्या देऊळकर (रा.शिवनगर माळेगांव) याने डोक्यात व पाठीवर जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला.महेश पैठणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून स्वप्निल ऊर्फ पिल्या देऊळकर, नितीन वसंतराव तावरे पाटील, सचिन वसंतराव तावरे पाटील यांच्यावर विविध कलमासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एकजण गावचा माजी उपसरपंच आहे. यात याचे नाव असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान जखमी महेश पैठणकर यांच्यावर बारामतीत खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment