महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ च्या स.मा.गर्गे भवनास मराठवाडा विभागीय आयुक्त मा. सुनील केंद्रेकर यांची भेट.. बीड:- बीड येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ च्या स.मा.गर्गे भवनास मराठवाडा विभागीय आयुक्त मा. सुनील केंद्रेकर यांनी बुधवारी भेट दिली.यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार उपस्थित होते.स्वागत पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व संतोष मानुरकर यांनी केला.पत्रकार संघाच्या वतीने सुरू असलेल्या,अभ्यासिकासह इतर उपक्रमां बद्ल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.तर जिल्हाधिकारी असताना व बदली झाल्यानंतर पत्रकारांनी उभारलेले आंदोलन, सरकारला बदली आदेश मागे घ्यावा लागला,आजही बीडचे लोक किती प्रेम करतात याचा प्रत्यय येतो अशा अनेक आठवणी वर चर्चा झाली. यावेळी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, व्यापारी महासंघाचे संतोष सोहनी, सरपंच वैजनाथ तांदळे व पत्रकार, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Top Ad
Thursday, August 11, 2022
Home
ताज्या घडामोडी
बीड
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ च्या स.मा.गर्गे भवनास मराठवाडा विभागीय आयुक्त मा. सुनील केंद्रेकर यांची भेट..
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ च्या स.मा.गर्गे भवनास मराठवाडा विभागीय आयुक्त मा. सुनील केंद्रेकर यांची भेट..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment