क्रांती दिनानिमित्त क्रांतिकारकांना पोवाड्याच्या माध्यमातून आदरांजली* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 9, 2022

क्रांती दिनानिमित्त क्रांतिकारकांना पोवाड्याच्या माध्यमातून आदरांजली*

*क्रांती दिनानिमित्त क्रांतिकारकांना पोवाड्याच्या माध्यमातून आदरांजली*

पुणे दि.९: तहसिल कार्यालय पुणे  शहरतर्फे क्रांती दिनानिमित्त  आज शनिवारवाडा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व  क्रांतिकारकांना पोवाड्याच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात आली.

शनिवारवाडा येथे आयोजित कार्यक्रमाला उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, तहसीलदार राधिका हवळ-बारटक्के उपस्थित होत्या.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान 'हर घर तिरंगा' उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यासोबत उपजिल्हा निवडणुक निवडणूक अधिकारी श्रीमती सावंत यांनी  मतदारांना वोटर हेल्पलाइन ॲपद्वारे मतदान कार्ड आधार कार्डशी संलग्न करण्याच्या कार्यपद्धती बाबत माहिती दिली.

No comments:

Post a Comment