बारामती येथील कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, November 13, 2022

बारामती येथील कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक*

*बारामती येथील कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक*

बारामती:- पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्या वतीने ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी संधी मिळणेकरीता आंतर तालुका क्रिकेट सामन्यांचे पुणे येथे दिनांक 31 ऑक्टोंबर 2022 ते 8 नोव्हेंबर 2022 पर्यंत आयोजन करण्यात होते. सदर स्पर्धेमध्ये जिल्हृयामधील 10 नामवंत संघ सहभागी झाले होते. 
कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा प्रथम सामना बारामती येथील डी.जे.क्रिकेट अॅकॅडमी बरोबर डिझायर स्पोर्टस कोर्पोरेशन लोणी काळभोर ता. हवेली याठिकाणी खेळला गेला. या सामन्यामध्ये डि.जे. क्रिकेट अॅकॅडमी संघाने नाणेफेक जिंकून कारभारी जिमखाना क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजी करण्याकरीता आमंत्रित केले त्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना दुष्यंत इंगुले व इंद्रजित साळवे यांची 138 धावांची सलामी दिली त्यामध्ये अनुक्रमे दुष्यंत इंगुले 85 धावा व इंद्रजित साळवे 53 धावा व त्यानंतर सुरज जाधव 21 धावा, वसिम शेख 19 धावा या फलंदाजीच्या जोरावर 184 धावांचा भलामोठा डोंगर उभा करून ठेवला सदर धावांचा पाठलाग करताना सुरज वाघमारे (4-22-2), वसिम शेख (3-17-1), मोहित जाधव (3-35-1) यांच्या गोलंदाजीसमोर डी.जे. क्रिकेट अॅकॅडमीचा संघ 151 धावांमध्ये गारद करून आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेमधील साखळी सामन्यातील पहिल्या मॅचमध्ये कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने विजयी सलामी करून सुरूवात केली. सदर सामन्यात कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा फलंदाज दुष्यंत इंगुले यास सामनावीराचा बहुमान देण्यात आला.
त्यानंतर कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा दुसरा सामना इंदापूर येथील एस.जे.क्रिकेट अॅकॅडमी बरोबर लिजंड स्पोर्टस अॅकॅडमी मुंढवा, हडपसर ता. हवेली याठिकाणी खेळला गेला. या सामन्यामध्ये एस.जे. क्रिकेट अॅकॅडमी संघाने नाणेफेक जिंकून कारभारी जिमखाना क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजी करण्याकरीता आमंत्रित केले त्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना अनुक्रमे दुष्यंत इंगुले 45 चेंडूमध्ये 61 धावा, सुरज जाधव 20 चेंडूमध्ये 42 धावा, हर्षवर्धन ठाकूर 7 चेंडूमध्ये 17 धावांच्या जोरावर कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने 19 षटकांमध्ये 184 धावा फटकाविल्या त्याचा पाठलाग करताना एस.जे. अॅकॅडमीचा संघ वसीम शेख (4-11-2), सुरज जाधव (4-10-3), मोहित जाधव (4-7-2), जोशुवा जाधव (1-4-2) यांच्या गोलंदाजीसमोर एस.जे. क्रिकेट अॅकॅडमीचा संघ 74 धावांमध्ये गारद करून आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेमधील साखळी सामन्यातील दुसÚया मॅचमध्ये कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने विजय मिळविला. सदर सामन्यात कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा ऑलराउंडर सुरज जाधव यास सामनावीराचा बहुमान मिळाला.
त्यानंतर कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा तिसरा सामना उरळी  कांचन येथील वॉरिअर्स क्रिकेट अॅकॅडमी बरोबर डिझायर्स स्पोर्टस् कॉर्पोरेशन, लोणी काळभोर, ता. हवेली याठिकाणी खेळला गेला. या सामन्यामध्ये कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला व समोरील संघाला फलंदाजी करण्याकरीता आमंत्रित केले. त्यामध्ये गोलंदाजी  करताना मोहित जाधव (4-19-3) व सुरज जाधव (4-16-4) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर वॉरिअर्स क्रिकेट अॅकॅडमी संघ 20 षटकांमध्ये 108 धावा करून तंबूत परविण्यात यश आले. प्रतिउत्तरास सदर धावांचा पाठलाग करताना कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने एका विकेटच्या मोबदल्यामध्ये इंद्रजित साळवे 20 चेंडूमध्ये 38 धावा व दुष्यंत इंगुले 40 चंेडूमध्ये 61 धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर एकहाती विजय मिळवित दिमाखदार पध्दतीने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. सदर सामन्यात कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा ऑलराउंडर सुरज जाधव यास सामनावीराचा बहुमान मिळाला.
त्यानंतर कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा उपांत्य फेरीचा सामना उरळी कांचन येथील वैभव क्रिकेट अॅकॅडमी बरोबर लिजंड स्पोर्टस अॅकॅडमी मुंढवा, हडपसर ता. हवेली याठिकाणी खेळला गेला. या सामन्यामध्ये कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व समोरील संघाला क्षेत्ररक्षणाकरीता आमंत्रित केले. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना दुष्यंत इंगुले 25 चेंडूमध्ये 30 धावा, सुजित उबाळे 10 चेंडूमध्ये 19 धावा, सुरज जाधव 10 चेंडूमध्ये 20 धावा, सुरज वाघमारे 8 चेंडूमध्ये 17 धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर 130 धावा उभारल्या. सदर धावांचा पाठलाग करताना मोहित जाधव (4-11-0) व वसिम शेख (4-7-0), सुरज वाघमारे (4-23-2) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर वैभव क्रिकेट अॅकॅडमी संघ 20 षटकांमध्ये 124 धावा करून पराभूत  झाला सदरचा सामना जिंकून कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने मोठ्या दिमाखात अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला. सदर सामन्यात कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा ऑलराउंडर सुरज वाघमारे यास सामनावीराचा बहुमान मिळाला.
कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा अंतिम सामना दिनांक 8 नोव्हेंबर 2022 रोजी डी.जे.क्रिकेट अॅकॅडमी बरोबर लिजंड स्पोर्टस अॅकॅडमी मुंढवा, हडपसर ता. हवेली याठिकाणी खेळला गेला. या सामन्यामध्ये कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने नाणेफेक प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत रोमहर्षक व अती-तटीच्या या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना दुष्यंत इंगुले 19 चेंडूमध्ये 19 धावा, वैभव कांबळे 20 चेंडूमध्ये 29 धावा, हर्षवर्धन ठाकूर 6 चेंडूमध्ये 16 धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर 106 धावाच करता आल्या मात्र, त्यानंतर गोलंदाजी करताना चेतन शेंडे (4-9-2), वसिम शेख (4-17-2), सुरज वाघमारे (4-17-2) यांच्या गोलंदाजीसमोर डी.जे. क्रिकेट अॅकॅडमीचा संघ फक्त 93 धावांमध्ये गारद करून आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेमधील प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकाविण्यात बारामती येथील कारभारी जिमखाना क्रिकेट संघाला यश आले. सदर सामन्यात कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा गोलंदाज चेतन शेंडे यास सामनावीराचा बहुमान देण्यात आला. 
कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने या वर्षामध्ये संपुर्ण जिल्हृयामध्ये विविध वयोगटातील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये सलग 5 वेळा प्रथम क्रमांक पटकावून जिल्हृयामध्ये निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात यश मिळविले असून कारभारी जिमखाना क्रिकेट संघावर संपुर्ण जिल्हृयातील क्रिकेटप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळ्या करीता पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित पदाधिकारी श्री. विवेक डफळ, श्री. सुशिल शेवाळे, श्री. डफेदार सर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कारभारी जिमखाना क्रिकेट संघास प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले व संपुर्ण संघाचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 
पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेमध्ये कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा दुष्यंत इंगुले या खेळाडूने 6 सामन्यांमध्ये घणघाती फलंदाजी करत 295 धावा फटकाविल्यामुळे त्यास  ‘उत्कृष्ट फलंदाज’ म्हणुन ट्रॉफी देवून गौरविण्यात आले.
कारभारी जिमखाना क्रिकेट संघाला श्री. नितीन सामल, श्री. विनोद यादव, श्री. संजय हाडके, श्री. सचिन माने यांचे मार्गदर्शन व श्री. प्रशांत (नाना) सातव यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य नेहमीच लाभत असल्यामुळे व संघ वेळोवेळी विजयी वाटचाल करीत असल्यामुळे कारभारी आण्णा चॅरिटेबल फाऊंडेशन चे अध्यक्ष व विश्वस्तांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. 

No comments:

Post a Comment