बापरे.. इन्स्टाग्रामवर अधिक वेळ घालवायची पत्नी,म्हणून पतीने केली पत्नीची गळा दाबून हत्या...
तीरपूर :- मोबाईचा वापर इतका वाढला की, माणूस माणसात राहिला नाही जिकडे तिकडे फक्त मोबाईल वर बोलताना किंवा मोबाईलवर खेळताना दिसत आहे, अति मोबाईल वापरामुळे काय घडले याबाबत नुकताच एक घटना पुढे आली, मोठ्या प्रमाणावर इंस्टाग्राम व वॉट्स अप मध्ये जास्त अडकलेले दिसत आहे, इंस्टाग्रामचा अतिवापर मात्र परिणामकारक ठरत आहे.तरुणाईच्या बाबतीत शिक्षणावर परिणाम करणारा ठरतोय, तर विवाहित दांपत्यामध्ये हाच इंस्टाग्रामचा वापर कळीचा मुद्दा बनतो आहे. इंस्टाग्रामच्या अतिवापरातून नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे.पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली,पत्नी जास्त वेळ इंस्टाग्रामवर व्यस्त असते, तिला वारंवार समज देऊनही तिने इंस्टाग्रामचा नाद सोडला नाही. त्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीला अत्यंत क्रूर
पद्धतीने धडा शिकवला. पतीने मागेपुढे न पाहता
पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली.
तामिळनाडूच्या तीरपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. सोशल मीडियाचा अतिवापर एका महिलेच्या जीवावर बेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडायचे, हत्या केलेल्या महिलेचे नाव चित्रा असे आहे. हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. चित्राला इंस्टाग्रामवर रिल्स बनवून त्या सोशल मीडिया शेअर करण्याची सवय होती. तिचा हा छंद रोखण्यासाठी पतीने अनेक प्रयत्न केले. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडायचे.नुकत्याच झालेल्या वादात पतीला त्याचा राग अनावर झाला आणि त्याने घरातील शाल घेऊन पत्नीचा गळा आवळला. त्यामुळे गुदमरलेल्या पत्नी बेशुद्ध पडली ते पाहून भेदरलेल्या पतीने पळ काढला.नंतर पतीने मुलीला कॉल करून घटनेची माहिती दिली.
त्यानंतर विवाहित मुलीने माहेर गाठले, तेव्हा तिला घरामध्ये आई मृतावस्थेत आढळले. त्यावेळी तिने पोलिसांना खबर दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आणि आरोपी अमृतलिंगमला अटक केली.
No comments:
Post a Comment