क्रांतीसुर्य सामाजिक असोसिएशन व क्रांतीसुर्य सामाजिक संघटना यांच्या वतीने नवीन संकल्प.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, November 27, 2022

क्रांतीसुर्य सामाजिक असोसिएशन व क्रांतीसुर्य सामाजिक संघटना यांच्या वतीने नवीन संकल्प..

क्रांतीसुर्य सामाजिक असोसिएशन व क्रांतीसुर्य सामाजिक संघटना यांच्या वतीने नवीन संकल्प..                                                  वालचंदनगर:-क्रांतीसुर्य सामाजिक असोसिएशन व क्रांतीसुर्य सामाजिक संघटना यांच्या विद्यमानाने यांच्या शिष्टमंडळाच्या विचाराने शासनाच्या नियमानुसार हर घर तिरंगा राबवली गेला त्याचप्रमाणे हर घर संविधान राबवली पाहिजे त्या उद्दिष्टाने क्रांतीसुर्य सामाजिक असोसिएशन यांनी ग्रामपंचायत शासकीय नीम  शासकीय संस्था पोलीस स्टेशन दुकाने घरे जाऊन भारतीय संविधान व संविधान प्रस्तावना देण्याचा संकल्प केला त्याचबरोबर 26/11/2022 या संविधान  दिनानिमित्त हा संकल्प राबवण्यात आला यावेळी ग्रामपंचायत जांब वालचंद नगर कुरवली तसेच पोलीस स्टेशन  या शासकीय विभागात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला तसेच बोरी येथील सीमाताई वाघमोडे यांच्या आश्रम शाळेला भेट देऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी किराणा देण्यात आला तसेच काझड या गावी दया साहेब नरुटे पाटील यांच्याही आश्रम शाळेला भेट देऊन शालेय विद्यार्थ्यांना थंडीचे शूटर देण्यात आले यासाठी उपस्थित क्रांतीसुर्य सामाजिक असोसिएशनचे संस्थापक बाबासाहेब सावंत तसेच सचिव अनिल दनाने तसेच  तालुका अध्यक्ष संतोष कुंभार वालचंद नगर शहर अध्यक्ष दादासाहेब पठाण तसेच सल्लागार योगेश करे साहेब सामाजिक कार्यकर्ते हेमंत जावीर  साहेब तसेच सामाजिक कार्यकर्ते झोडगे साहेब उपस्थित होते.

No comments:

Post a Comment