बारामतीत नक्की चाललंय काय? हॉटेल अभिषेक मालकांनी आणि मॅनेजर ने केला महिलेवर अन्याय? विनयभंग कायदा अंतर्गत बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 16, 2023

बारामतीत नक्की चाललंय काय? हॉटेल अभिषेक मालकांनी आणि मॅनेजर ने केला महिलेवर अन्याय? विनयभंग कायदा अंतर्गत बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल...

बारामतीत नक्की चाललंय काय? हॉटेल अभिषेक मालकांनी आणि मॅनेजर ने केला महिलेवर अन्याय? विनयभंग कायदा अंतर्गत बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल...
बारामती :- नुकताच लेखी पत्राद्वारे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ६ डिसेंबर २०२३ आणि ७ डिसेंबर २०२३ रोजी आर्थिक व्यवहारामुळे मुंबई येथून बारामती मध्ये कामासाठी आलेल्या कंपनीचे संचालक (पीडित महिला) महिलेला रात्री अपरात्री हॉटेलचे राहायचे पैसे पूर्ण भरले नाही म्हणून ११ वाजता हॉटेल बाहेर काढले गेले. हॉटेलच्या मॅनेजर आदर्श यांनी महिलेचा अपमान केला हॉटेल मॅनेजर आदर्श यांनी पीडित महिलेला  पूर्ण पेमेंट करा मला आपणास हॉटेल मध्ये राहायला देयचे नाही आपण बाहेर निघा,रूम सोडून जा,तुम्ही तुमच्या रूममध्ये पुरुष आणता,मला तुमच्या सारख्या लोकांना ठेवायचे नाही असे सांगत हॉटेल मधून रात्री ११ वाजता बाहेर काढले. महिलेने त्या रात्री पोलीस मदतीसाठी ११२ ला फोन केले असता देखील त्यांना काहीही मदत मिळाली नाही. ती महिला तात्पुरती दुसऱ्या हॉटेल मध्ये राहण्यास गेली. दुसऱ्या दिवशी पीडित महिला बारामती तालुका पोलीस स्टेशन मध्ये गेली असता तिच्यावर झालेल्या अपमानावर पोलीस स्टेशन ने दखल घेतली नसल्याचे सांगत आहे. नंतर ती महिला बारामती राष्ट्रवादी भवन मध्ये मदतीसाठी गेली असता तिची फक्त विचारपूस करण्यात आली. मुंबई येथून आलेल्या पीडित महिलेला कोणही मदत करत दिसत नव्हते त्यांनी शेवटी आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांना आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती सांगितली तेव्हा तातडीने सूत्र हलले आणि बारामती तालुका पोलीस स्टेशन मध्ये पीडित महिला यांच्यावर झालेल्या अन्यायावर कार्यवाही करण्यात आली.
आदरणीय सुप्रियाताई मुळे आज बाहेर गावातल्या महिलेवर झालेल्या अन्यायाला न्याय
मिळाला. तातडीने बारामती पोलीस स्टेशन मध्ये दिनांक ११/१/२०२३ रोजी रात्री १० वा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु फिर्याद अपूर्ण केलेली माहिती पीडित महिले ने मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. इंगळे साहेब यांना पत्राद्वारे दिली.फिर्यादीत हॉटेल श्री अभिषेक मालक श्रीधर शेट्टी यांचे फक्त नाव घेण्यात आले
परंतु त्यांनी देखील फोन मध्ये महिले विरुद्ध अपमानित लज्जा निर्माण होणारे शब्द
वापरल्याचे कुठेही उल्लेख करण्यात आला नाही व महिलेला तक्रार वाचायला दुसरी प्रत दिली आणि दाखल दुसरे शब्दाने झाली अशी माहिती महिलेने मा. उपविभागीय पोलीस
अधिकारी श्री. इंगळे यांना ई-मेल द्वारे केली असल्याचे पीडित महिलेने लेखी पत्राद्वारे सांगितले अधिक तपास चालू आहे.
:चौकट - पीडित महिला - मी आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांची खूप आभारी आहे ताईंनी एक परगावातल्या महिलेवर झालेल्या अन्याय कळताच दुसऱ्या क्षणी कार्यवाही केली.खरंच ऐकले होते की पवार कुटुंब महिलेच्या सुरक्षेसाठी पुढे येतात पण आज अख्या मुंबई ला आदरणीय सुप्रिया ताईंचा आदर आहे की आपण आपले महत्व पूर्ण वेळ देऊन एका पीडित महिलेची मदत केली.अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

No comments:

Post a Comment