पोलीस स्थापना दिनानिमित्त बारामती शहर पोलिसाचा विद्यार्थ्यांशी संवाद.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 10, 2023

पोलीस स्थापना दिनानिमित्त बारामती शहर पोलिसाचा विद्यार्थ्यांशी संवाद..

पोलीस स्थापना दिनानिमित्त बारामती शहर पोलिसाचा विद्यार्थ्यांशी संवाद..
बारामती:- 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो 2 जानेवारी 1960 रोजी महाराष्ट्र पोलिसाला स्वतंत्र असा झेंडा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तेव्हापासून तो दिवस पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. पोलीस स्थापना दिनापासून सात दिवस पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो  निमित्त पोलीस व जनता यामधील संबंध सुधारण्यासाठी विविध कार्यक्रम साजरे केले जातात पोलीस खात्याची ओळख विद्यार्थी व जनतेला करून दिली जाते. जनता भिमुख पोलिसिंग हा त्यातील महत्त्वाचा उद्देश असतो पोलिसांची जनतेला भीती न वाटता आदर वाटावा यासाठी विविध प्रोग्राम घेतले जातात याचाच भाग म्हणून पोलीस खात्यामध्ये विविध प्रकारची शस्त्रे दारूगोळा असतात यांचं विद्यार्थ्यांना नेहमी विद्यार्थ्यांना कुतूहल असते अशा शस्त्रांची ओळख त्यांना करून देण्यात आली सदरचा कार्यक्रम टेक्निकल हायस्कूल या ठिकाणी घेण्यात आला.
तसेच दोन दिवसांपूर्वी वाहतुकीच्या चिन्हांचा अर्थ विद्यार्थ्यांना समजून सांगून पोलीस खात्यात विविध पदावर असणाऱ्या पोलीस अधिकारी कसा ओळखावा याबाबत सुद्धा पोलिसांच्या माहिती करून देण्यात आली. सदरचे कार्यक्रम माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल,  माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे ,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक सुनील महाडिक सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ पालवे सहाय्यक पोलीस फौजदार काळे पोलीस हवालदार अतुल जाधव यांनी आयोजित केले.

No comments:

Post a Comment