खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला 15 वर्षे सक्तमुजरी;अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण भोवलं..
पुणे:-खाजगी कोचिंग क्लासेस च्या नावाखाली लुटमारीचा, भरमसाठ फीचा व्यवसाय चालू असल्याचे काही ठिकाणी दिसून येत असल्याचे कळतंय, तर कुठे मुलींवर अत्याचार होत असल्याचे बातम्या प्रसिद्ध होत आहे, अश्या विविध घटना घडत असल्याचे दिसत असताना नुकताच लग्नाचे आमिष दाखवुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या खासगी कोचिंग क्लासच्या नराधम शिक्षकाला 15 वर्षे सक्तमजुरी आणि 50 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.ही शिक्षा विशेष न्यायाधीश के. के. जहागिरदार यांनी ठोठावली आहे. दंडाची
रक्कम भरल्यास अपील कालावधी संपल्यानंतर ती रक्कम पिडीतेला देण्यात यावी असे देखील न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. गोपाळ किसनराव चव्हाण (33) असे शिक्षा सुनावण्यात
आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.सदरील गुन्हा हा डिसेंबर 2017 ते 2018 दरम्यान निगडी परिसरात घडला होता.सदरील प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उत्कर्षा
देशमुख यांनी केला आहे.गोपाळ चव्हाण हा भागिदारीमध्ये खासगी कोचिंग क्लास चालवत होता.त्याच्या क्लासमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या
पिडीत अल्पवयीन मुलीला त्याने लग्नाचे
आमिष दाखविले आणि तिच्या इच्छेविरूध्द शारीरिक संबंध ठेवले होते.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चव्हाणला
अटक केली होती.या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲड. सुचित्रा नरोटे यांनी 8 साक्षीदार तपासले.
आरोपीने अल्पवयीन विद्यार्थिनीचे आयुष्य
उध्दवस्त केले आहे. हा गुन्हा गंभीर असल्याने
आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी अॅड. सुचित्रा नरोटे यांनी केली. न्यायालयाने
चव्हाणला 15 वर्षे सक्तमजुरी आणि 50 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
No comments:
Post a Comment