बारामती नगर परिषदेचा कचरा घोटाळा,मा.विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते यांच्या तक्रारी नंतर बारामती नगर परिषदेला दणका..? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 26, 2023

बारामती नगर परिषदेचा कचरा घोटाळा,मा.विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते यांच्या तक्रारी नंतर बारामती नगर परिषदेला दणका..?

बारामती नगर परिषदेचा कचरा घोटाळा,मा.विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते यांच्या तक्रारी नंतर बारामती नगर परिषदेला दणका..?

बारामती(प्रतिनिधी):-बारामती नगर परिषदे ने 13 कोटींचा कचरा घोटाळा केल्याचा आरोप करत बारामती नगर परिषदेचे मा.विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते यांनी खळबळ उडवून दिली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की,बारामती नगर परिषदेने बारामती शहरातील कचरा संकलनासाठी एन.डी.के हॉस्पिलिटी या कंपनीला कचरा संकलनाचे कंत्राट दिले होते.या कचरा संकलनाच्या कामासाठी बारामती नगर परिषद एन.डी.के हॉस्पिलिटी दरमहा एक कोटी दहा लाख रुपये अदा करत आहे.परंतु कचरा संकलन करून कचरा डेपोवर गेल्यानंतर किती टन कचरा संकलन झाला याचे मोजमाप करणे आवश्यक आहे.त्यामुळे नगर परिषदेने त्या ठिकाणी एक वजन काटा बसवला होता.परंतु हा वजन काटा बसवत असताना बारामती नगर परिषदेने आवश्यक असणाऱ्या कोणत्याही बाबींची पूर्तता न करता बेकायदेशीररित्या हा वजन काटा बसवला.त्यानंतर हि बाब मा. विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वजनकाटा मापे निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली.त्यानंतर त्या वजनकाटा मापे निरीक्षकानीं याबाबत बारामती नगर परिषदेला विचारणा केली असता.त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज अखेर वजनकाटा मापे निरीक्षक योगेश टाळकुटे यांनी स्वतः त्या ठिकाणची पाहणी करून बारामती नगर परिषदेने बसविलेला बेकायदेशीर वजनकाटा सील केला असून आता बारामती नगर परिषदेवर फौजदारी खटला दाखल करावा अशी मागणी मा. विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते यांनी केली आहे.
      दरम्यान गेल्या काही दिवसांपासून याच बेकायदेशीर वजन काट्यावर वजन केले जात असून त्याच आधारे आता पर्यंत बारामती नगर परिषदेने एन.डी.के हॉस्पिलिटी ला सर्वच्या सर्व बिले अदा करून बारामती नगर परिषदेने कचरा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप सस्ते यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment