‘कारभारी प्रिमिअर लिग 2023’’ चा बक्षिस वितरण सोहळा अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते दिमाखात संपन्न* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 1, 2023

‘कारभारी प्रिमिअर लिग 2023’’ चा बक्षिस वितरण सोहळा अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते दिमाखात संपन्न*

‘कारभारी प्रिमिअर लिग 2023’’ चा बक्षिस वितरण सोहळा अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते दिमाखात संपन्न*
बारामती:-  शहर व तालुका क्रिकेट संघटनेच्या वतीने मा. श्री. अजितदादा पवार, विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र राज्य यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम बारामती येथे ‘‘कारभारी प्रिमिअर लिग 2023’’ चे आयोजन दिनांक 20 ते 29 एप्रिल 2023 दरम्यान करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन 20 एप्रिल 2023 रोजी श्री. शिरीषजी कंबोज सर, रजिस्ट्रार विद्या प्रतिष्ठान, बारामती, मा. श्री. किशोरजी भापकर, बिझनेस हेड आय.एस.एम.टी.लि., मा. श्री. जितेंद्र जाधव डायरेक्टर श्रायबर डायनामिक्स डेअरी प्रा.लि., मा.श्री. वैभव नावडकर उपविभागीय अधिकारी बारामती यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 
स्पर्धेचा अंतिम सामना दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी कसबा वॉरिअर्स विरूध्द बारामती स्मॅशर्स यांच्यामध्ये झाला या सामन्याची नाणेफेक  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार श्री. रोहितदादा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आली. अंतिम सामन्यामध्ये कसबा वॉरिअर्स संघाने सहजरित्या विजय मिळवित के.पी.एल. - 2023 चषकावर आपले नांव कोरले. सामन्याचा मानकरी अभिजीत एकशिंगे ठरला. सदरवेळी मा. श्री. रोहितदादा पवार साहेब यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कारभारी जिमखाना व बारामतीमधील तमामा क्रिकेट खेळाडूंच्या वतीने श्री. दौलत देसाई मा. जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. स्पर्धेच्या शेवट्या दिवशी विशेष अशा ‘सेलिब्रेटी मॅच’ चे आयोजन करण्यात आले होेते.
श्री. प्रशांत (नाना) सातव यांच्या विनंतीस मान देऊन मा. श्री. रोहितदादा पवार साहेबांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे निरीक्षक या स्पर्धेस पाठविले होते के.पी.एल. स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला त्या खेळाडूंचा विचार पुढील काळात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संघामध्ये निवडीकरीता होणार आहे.
सुरूवातीपासूनच लोकप्रिय ठरलेल्या ‘‘कारभारी प्रिमिअर लिग’’ स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळाही तितक्याच दिमाखात संपन्न झाला या सोहळ्यावेळी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते मा. श्री. अजितदादा पवार साहेब, बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा मा.सौ. सुनेत्रावहिणी पवार, पुनित बालन ग्रुप, पुणे चे अध्यक्ष श्री. पुनित दादा बालन, नगरीच्या नगराध्यक्षा सौ. पोर्णिमाताई तावरे, नगरीचे ज्येष्ठ नगरसेवक श्री. किरणदादा गुजर, दि बारामती सहकारी बँकेचे चेअरमन श्री. सचिनशेठ सातव, आय.एस.एम.टी. चे बिझनेस हेड श्री. किशोरजी भापकर, डायनामिक्स डेअरीज्चे डायरेक्टर श्री. जितेंद्र जाधव, उर्जा डेअरीचे श्री. प्रकाश कुतवळ, श्री. अमित मोडक, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी श्री. रणजित खिरीड, तसेच क्रिकेट क्षेत्रातील श्री. अनिल वाल्हेकर, श्री. नंदकुमार शिवले, श्री. राजेश कोतवाल, श्री. दिपक (आबा) गुजर व इतर मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पुनित दादा बालन यांनी के.पी.एल. स्पर्धेचे दिमाखदार आयोजन बघून स्पर्धेचा मानकरी सुदर्शन तोरडमल यास बालन ग्रुपच्या वतीने इलेक्ट्रीक बाईक देण्याची घोषणा केली.
सदरवेळी विजेत्या संघास मा. अजितदादांच्या शुभहस्ते के.पी.एल. चषक व रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले यावेळी बारामती नगरीस शैक्षणिक व औद्योगिक पंढरी म्हणुन ओळखले जाते त्याचप्रकारे प्रशांत (नाना) सातव यांनी केलेल्या दर्जेदार आयोजनामुळे भविष्यात बारामती ही  क्रिकेटपंढरी म्हणुनही ओळखली जावी व अशाचप्रकारे प्रशांत (नाना) सातव यांनी येथून पुढील काळात विविध खेळांच्या माध्यमातून सातत्य राखावे व उत्तोमत्तम खेळाडू घडवावेत असे प्रतिपादन मा. दादांनी केले. 
कारभारी प्रिमिअर लिग चे यशस्वीरित्या आयोजन करण्यामध्ये श्री. प्रशांत (नाना) सातव, श्री. सचिन माने, प्रमोद (आबा) सातव, पृथ्वीराज सातव, साक्षी ढवाण, सतिश ननवरे, अॅड. श्रीनिवास वायकर, योगेश (भैय्या) जगताप, रवि (आबा) काळे, वैभव काटे, निलेश कुलकर्णी, विक्रांत तांबे, हनुमंत (आप्पा) मोहिते, इरफानशेठ इनामदार, विनोद ओसवाल, सुजित पराडकर, अॅड. अमर महाडीक, अक्षय महाडीक, रणजित तावरे, राजन कोळेकर, सुभाषशेठ सोमाणी, राजेंद्र इंगवले, संतोष ढवाण, संतोष सातव, दशरथ जाधव यांनी विशेष परिश्रम व मोलाचे सहकार्य केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर (मामा) जगताप व मनिष पाटील यांनी केले.  

No comments:

Post a Comment