धक्कादायक..पिडीतेच्या असह्यतेचा फायदा उचलत तीला आश्रय देणारा निघाला अत्याचारी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, June 8, 2023

धक्कादायक..पिडीतेच्या असह्यतेचा फायदा उचलत तीला आश्रय देणारा निघाला अत्याचारी...

धक्कादायक..पिडीतेच्या असह्यतेचा फायदा उचलत तीला आश्रय देणारा निघाला अत्याचारी...
पनवेल:- असह्य महिलांचा गैरफायदा घेण्याऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये अनेक महिला, मुली बळी पडल्या आहेत, झालेल्या अत्याचाराची तक्रार करणार कुठे केली तर त्याची दखल घेतली जाईल का?असे प्रश्न पीडितांना पडत असतो तर काही वेळेस कर्तबगार पोलीस अधिकारी सत्यता पडताळून न्याय देण्यासाठी पाऊलं उचलतात अशीच एक घटना नुकतीच घडली राहायला घर आणि पोटभरायला नोकरी नसणाऱ्या एका पिडीतेच्या असह्यतेचा फायदा उचलत तीला राहण्यासाठी घरात प्रवेश दिल्यावर तीच्यावर मध्यरात्री अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी
खारघरमध्ये घडली.दोन दिवसांपूर्वी ३० वर्षीय पिडीता खारघर वसाहतीमध्ये नोकरीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न करत होती. या दरम्यान
तिला संशयीत आरोपीने भाड्याने घर देतो असे आश्वासन देऊन स्वतःच्या घरी आणले. संबंधित आरोपीने या पिडितेबाबत स्वतःच्या पत्नीला घर मिळेपर्यंत ती घरातच राहील असे सांगितले होते. घरात आश्रय दिल्यावर रात्री अडीच वाजता कुटुंबातील सर्व झोपल्यावर पिडीतेवर अत्याचार केल्याचे पिडीतेने पोलीसांना दिलेल्या तक्रारीत
म्हटले आहे.यावेळी संशयीत आरोपीने स्वतःची पत्नी आजारी असून पिडितेशी लग्न करेन, दुसरे घर घेऊन देतो असेही आमिष दिले. मात्र याबाबत बुधवारी पिडितेने खारघर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली. पिडिता घरकाम करुन
स्वतःचा उदरनिर्वाह चालविते. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ हे अधिक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment