बारामती लोकसभेसाठी भाजपकडून या आमदारावर बारामती जिंकण्यासाठी जबाबदारी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, June 8, 2023

बारामती लोकसभेसाठी भाजपकडून या आमदारावर बारामती जिंकण्यासाठी जबाबदारी...

बारामती लोकसभेसाठी भाजपकडून या आमदारावर बारामती जिंकण्यासाठी जबाबदारी...
बारामती :-भाजपने नवी खेळी करत पक्ष मजबूत करण्याबरोबर सर्व जागा निवडून आणण्यासाठी जय्यत तयारी केली असून त्यादृष्टीने पाऊलं उचलली असल्याचे दिसत आहे, लोकसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी आहे.राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने आता आमदार राहुल कुल यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली असून
भाजपच्यावतीने बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार राहुल कुल यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या आज
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या आहेत.यामध्ये आमदार राहुल कुल यांना बारामती लोकसभा मतदासंघांची जबाबदारी देण्यात आली आहे.तर रंजन काका तावरे यांच्यावर बारामती विधानसभेची जबाबदारी दिली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment