बारामतीच्या जि. प. शाळेतचिमुरड्या विद्यार्थ्यांना बेधुंद झिंगलेला गुरुजी पहावा लागला..गटशिक्षण अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, June 23, 2023

बारामतीच्या जि. प. शाळेतचिमुरड्या विद्यार्थ्यांना बेधुंद झिंगलेला गुरुजी पहावा लागला..गटशिक्षण अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली..

बारामतीच्या जि. प. शाळेत
चिमुरड्या विद्यार्थ्यांना बेधुंद झिंगलेला गुरुजी पहावा लागला..गटशिक्षण अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली..
बारामती:- तरडोली (ता. बारामती)
ग्रामपंचायतअंतर्गत भोईटेवाडी जिल्हा परिषद
प्राथमिक शाळेत एका गुरुजीने आज चक्क दारू पिऊन टेबलावरच ताणून दिली होती. जागरूक नागरिकाने अचानक शाळाभेट केल्याने त्याची मद्यधुंद अवस्था समोर आली याबाबतचा व्हिडिओ बनविला गेल्याने बारामती तालुका गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशी समिती नेमली असून कडक कारवाईचे संकेत दिले आहेत,भोईटेवाडी जिल्हा परिषद शाळेत 25 विद्यार्थी शिकत आहेत. शाळा सुरू होऊन 15 दिवसही झाले नाहीत आणि शिक्षक भरत चव्हाण यांनी आपले अवगुण दाखवायला
सुरुवात केली. गेल्या वर्षभर ग्रामस्थांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली होती. मात्र आपले कोणीच वाकडे करू शकत नाही या भ्रमाने चव्हाण याने संधी वाया घालवली आणि
चिमुरड्या विद्यार्थ्यांना बेधुंद झिंगलेला गुरुजी पहावा लागला आज ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी व त्यांचे सहकारी सतीश भापकर अचानक शाळा भेटीसाठी गेले. यावेळी
मुख्याध्यापक अशोक जगदाळे यांनी सगळी मुले एकाच वर्गात घेऊन शिकवण्याचे काम सुरू ठेवलेले होती. दुसऱ्या वर्गात घेऊन शिकवण्याचे काम सुरू ठेवलेले होती. दुसऱ्या वर्गात चौधरी गेले तर भरत चव्हाण हा शिक्षक खुर्चीत बसून
टेबलावर डोके ठेवून मस्तपैकी झोपी गेला होता. चौधरी यांनी त्यांना अनेक हाका मारल्या तेंव्हा कुठे ते जागे झाले.मात्र ते भरपूर दारू प्यायल्याने तर शुद्धीत नाहीत हे चौधरी यांच्या लक्षात आले. अखेर चौधरी यांनी संबंधित घटनेचा
व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक चव्हाण यास मिटवून घेऊ असे शब्द वापरत पाठीशी घालताना दिसत आहेत. तर चव्हाण हा चालण्याच्या आणि बोलण्याच्याही अवस्थेत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच
तो लागले आहे, आजारी आहे असा बनावही करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
विद्यार्थी गेले वर्षभर याला सहन करत असल्याची चर्चा आहे. बारामतीसारख्या तालुक्यात अशी घटना समोर आल्याने जोरदार चर्चा झडत आहे. असे अनेक शिक्षक प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये असून त्यांच्यावर कडक
कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. पालकांनी विद्यार्थीहित डोळ्यापुढे ठेवून संतोष चौधरी यांच्याप्रमाणे दक्ष रहावे असे मत व्यक्त होत आहे. गुणी शिक्षकही या प्रकाराने अस्वस्थ आहेत.संतोष चौधरी म्हणाले, गरिबांची मुले या शाळेत शिकतात त्यांना चांगले शिक्षण मिळावे इतकी साधी अपेक्षा आहे.मात्र चव्हाण यांना सुधारण्यासाठी आम्ही विनंती करत
होतो. आज दारू पिऊन झोपल्याचा पुरावाचा आम्हाला सापडला. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी न्यायचे होते मात्र ते निघून गेले. शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेऊन
आम्हाला चांगले शिक्षक द्यावेत.
गटशिक्षणाधिकारी संपत गावडे म्हणाले, संबंधित
शिक्षकाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे. उद्याच अहवाल येईल. वैद्यकीय तपासणीही होईल.जे येईल त्यावर कडक कारवाई होईल. मुख्याध्यापकाला
देखील नोटीस बजावली आहे. गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेस कळविले आहे.

No comments:

Post a Comment