श्री.रोहित बनकर प्रदेश उपाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग पदाचा दिलेला राजीनामा नामंजूर.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 14, 2023

श्री.रोहित बनकर प्रदेश उपाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग पदाचा दिलेला राजीनामा नामंजूर..

श्री.रोहित बनकर प्रदेश उपाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग पदाचा दिलेला राजीनामा नामंजूर..

 बारामती:- नुकताच स्थानिक राजकीय कूरघोडी ला कंटाळून बारामती युवा नेते रोहित बनकर प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल यांनी आपल्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा ओबीसी विभाग प्रदेश कार्यालयाकडे पाठवला होता परंतू सदर राजिनामा बाबत ओबीसी विभाग प्रदेश अध्यक्ष श्री.भानुदासजी माळी साहेब यांनी प्रांताध्यक्ष आ. श्री.नानाभाऊ पटोले यांच्याशी चर्चा केली.आपण बारामती सारख्या शहरात उत्तम प्रकारे काँग्रेस पक्षाचे काम करीत आहात त्या कामाची दखल घेऊन प्रांताध्यक्ष आ.श्री.नानाभाऊ पटोले यांनी राजिनामा नामंजूर करण्यात यावा असे आदेश श्री.भानुदासजी माळी साहेब यांना दिले.नानाभाऊ पटोले यांनी दिलेल्या आदेशाची श्री.भानुदासजी माळी यांनी अंमलबजावणी केली असून आपला राजिनामा नामंजूर करण्यात येत आहे याची नोंद घेऊन आपण पुन्हा एकदा ओबीसींना न्याय देण्यासाठी व काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्याकरिता पुन्हा एकदा जोमाने काम कराल हीच अपेक्षा असे पत्र श्री.धैर्यशील सुपले - प्रदेश सरचिटणीस,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग,श्री.शैलेश राऊत - प्रदेश प्रसिध्दी प्रमुख,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग यांनी दिलेल्या पत्राद्वारे कळविले.

No comments:

Post a Comment