धक्कादायक.. बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर
बलात्कार...
पुणे:-पिस्तूलाचे प्रमाण वाढत असून चोऱ्या,दरोडे,धमकी यासाठी वापर होत असताना आत्ता महिलांवर अत्याचार करण्यासाठी वापर होत असल्याचे नुकताच घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे याबाबत मिळालेली माहितीनुसार पुण्यातील बाणेर परिसरात विवाहसंबंधीत
सोशल साईटवरून ओळख झालेल्या तरुणीला
भेटण्यास बोलवून एका हॉटेलात नेहून तरुणीला
पिस्तूल दाखवत बलात्कार केल्याचा धक्कादायक
प्रकार समोर आला आहे. ही घटना बाणेरमधील नामांकित हॉटेलमध्ये दोन महिन्यापुर्वी घडली आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात राहुल चंद्रकांत यादव (रा. सोना अपार्टमेंट औंध रोड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० वर्षीय पीडित तरुणीने तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल यादव व पीडित तरुणी यांची शादी डॉटकॉम या सोशल साईटवरून ओळख झाली होती. राहुल याने तरुणीचा विश्वास संपादन केला. तिच्याशी ओळख वाढवली. तसेच, २४ जूनच्या रात्री या तरुणीला भेटण्यासाठी बाणेर परिसरात बोलावले.तरुणी भेटण्यास आल्यानंतर परिसरातील एका नामांकित हॉटेलात नेले. त्याठिकाणी गेल्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून या तरुणीसोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. याबाबत तरुणीने कोंढवा पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा नोंद करून अधिक तपासासाठी चतुःशृंगी पोलिसांकडे वर्ग केला आहे.
No comments:
Post a Comment