मंगळागौरीत भाग घेतलेल्या सिद्दीविनायक प्रतिष्ठानच्या महिलांनी दाखविला पारंपरिक नृत्याचा अविष्कार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, August 12, 2023

मंगळागौरीत भाग घेतलेल्या सिद्दीविनायक प्रतिष्ठानच्या महिलांनी दाखविला पारंपरिक नृत्याचा अविष्कार..

मंगळागौरीत भाग घेतलेल्या सिद्दीविनायक प्रतिष्ठानच्या महिलांनी दाखविला पारंपरिक नृत्याचा अविष्कार..                                                                              बारामती(संतोष जाधव):- नुकताच झालेल्या सिद्दीविनायक विकास प्रतिष्ठान क्षत्रिय नगर, टकार कॉलनी बारामती येथे प्रतिष्ठानच्या 25 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत तीन दिवस सांस्कृतिक ,कीर्तन,भारुड, महाप्रसाद, महाआरती, डान्सस्पर्धा,भव्य मिरवणूक असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,सिद्धीविनायक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अनिल गायकवाड(मा. उपनगराध्यक्ष)व पदाधिकारी सदस्य, समाज बांधव,क्षत्रिय तरुण मंडळ,महिला भगिनी यांच्या सहकार्याने हा आयोजित करण्यात आले होते यावेळी शरयू फाउंडेशन च्या सौ शर्मिलावहिनी पवार ,मा. जेष्ठ नगरसेवक सुभाष अप्पा ढोले यांच्या सह अनेक मान्यवऱ्याच्या उपस्थितीत मंगळागौरी चा कार्यक्रम पार पडला यामध्ये सौ.सुवर्णा अनिल गायकवाड, सौ. जयश्री शेखर गायकवाड,सौ.अंजली अनिल गायकवाड,सौ.ममता बाबूलाल जाधव,सौ.गायत्री श्रीकांत गायकवाड,सौ.स्मिता राजू गायकवाड,सौ.पूजा सागर जाधव,सौ.वृषाली सुमित गायकवाड,सौ.प्रणाली प्रवीण पवार(जाधव),कु.वैष्णवी शेखर गायकवाड महिलांनी सहभागी होत पारंपारिक नृत्य सादर करीत उपस्थितीताची मने जिंकली पाऊण तास स्टेजवर नाचणाऱ्या महिलांचं कौतुक करून सौ. शर्मिला वहिनी यांनी सत्कार केला.यावेळी प्रतिष्ठानचे  बाळासाहेब(अनिल)गायकवाड,शेखर गायकवाड, संजय गायकवाड,गणेश गायकवाड, संजय जाधव,संजय गायकवाड,राजेंद्र निगडे, लक्ष्मण जाधव,सतिश गायकवाड,सुनील जाधव, मिलिंद गायकवाड व क्षत्रिय तरुण मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी सदस्य यांनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन महेंद्र सर गायकवाड यांनी केले.

No comments:

Post a Comment