बारामती लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस उमेदवार रोहित बनकर यांच्या नावाला जनतेमधून वाढता प्रतिसाद.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 17, 2023

बारामती लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस उमेदवार रोहित बनकर यांच्या नावाला जनतेमधून वाढता प्रतिसाद..

बारामती लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस उमेदवार रोहित बनकर यांच्या नावाला जनतेमधून वाढता प्रतिसाद..
बारामती:- बारामती लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसचे रोहित बनकर यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बारामतीसह पुणे जिल्ह्यात त्यांच्या नावाच्या चर्चेला उधान आलेले दिसत आहे. यांच्या नावामुळे ओबीसी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
रोहित बनकर हे कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून सध्या काम करीत आहेत. या पदाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासह पुणे जिल्हा, बारामती तालुक्यात कामातून ओळख निर्माण केलेली आहे. बारामती लोकसभा मतदार संघ हा घराणेशाही म्हणून ओळखला जातो. या मतदार संघातून ओबीसी समाजाचा नवा चेहरा व वेगळे नाव आल्याने रोहित बनकर यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांचे स्वागत होत आहे. 
विविध प्रश्र्न उपस्थित झाल्यास त्याबाबत आवाज उठविण्यासाठी किंवा ते प्रश्र्न मार्गी लागण्यासाठी रोहित बनकर त्या प्रश्र्नाचा छडा लावेपर्यंत मागे फिरत नाही. अशी आगळी वेगळी ओळख त्यांनी निर्माण झालेली आहे. गोर-गरीब, दु:खी पिडीतांचे प्रश्र्न राष्ट्रपतीपासुन ते गावपातळीपर्यंत मांडण्याचे कसब त्यांच्यामध्ये आहे.सध्या ओबीसींचा प्रश्र्न ऐरणीवर येऊन ठेपलेला असताना, रोहित बनकर ओबीसीच्या माध्यमातून विविध प्रश्र्न समाजासमोर मांडत आलेले आहेत. ओबीसी समाजातून रोहित बनकर असल्याने येणार्‍या लोकसभा निवडणूकीत ओबीसीचा नवा चेहरा मतदारांना पहावयास मिळणार आहे व त्यांच्या नावास अधिकची पसंती लाभत आहे. रोहित बनकर यांचे सर्वपक्षीय असणारे संबंधामुळे येणार्‍या निवडणूकीत त्यांचे पारडे जड झाल्याशिवाय राहणार नाही असेही मतदारांमधून बोलले जात आहे.
रोहित बनकर एसटी, एससी, ओबीसी व अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्र्नासाठी उभे राहणारे एकमेव तळागळात काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे या प्रवर्गातून सुद्धा त्यांच्या नावाला जास्तीची पसंती येत असल्याचे दिसत आहे. कॉंग्रेस पक्षाने बारामती लोकसभा मतदार संघातून रोहित बनकर यांना आखाड्यात उतरविल्याचे दिसत आहे. रोहित बनकर सुद्धा राजकीय आखाड्यात तेल लावून उतरलेले आहेत. त्यांना समाजातून, नागरीकांतून मिळत असलेला पाठिंब्यामुळे ते बारामती लोकसभा चांगली गाजवितील असेही बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment