बीड:-सद्या व्होवर लोड, अवैध वाहतूक करणारे हायवा गाड्या यांच्याकडून महिन्याला काही रक्कम कार्ड स्वरूपात स्वीकारले जात असल्याचे ड्रायव्हर बोलताना दिसत असले आणि त्याची तक्रारी केल्या तरी कारवाई होत नसल्याचे सांगण्यात येत आहे, आरटीओ कार्यालयात
एजंटांचा सुळसुळाट कायम पाहण्यास मिळत
असतो. येथील प्रत्येक काम एजंट मार्फत केले जात
असल्याचा अनुभव येतो. मात्र याचा फायदा काही एजंट
घेत असतात.असाच काहीसा प्रकार बीडच्या आरटीओ कार्यालयात
चक्क आरटीओच्या नावाने एजंटने ८ हजार रुपये
घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई करत
एजंटला ताब्यात घेतले आहे.
आरटीओ कार्यालयात ६०० रुपयांत होणाऱ्या कामांसाठी
बीडच्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या नावाने एजंटाने १०
हजार रुपये मागितले. त्यातील ८ हजार रुपये घेताना
एजंटाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
ही कारवाई बीड शहरातील बशीरगंज चौकात करण्यात
आली. अब्दुल रहीम अब्दुल मजीद असे पकडलेल्या
एजंटाचे नाव आहे. दरम्यान, पकडल्यानंतर एजंटाने पळून
जाण्याचा प्रयत्न केला.
तडजोडीअंती ठरले ८ हजार
आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक रंजित
पाटील यांच्या नावाने १० हजार रुपयांची लाच मागणी
केली. मात्र तक्रादाराने केलेल्या तडजोडीत ८ हजार रुपये
देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार त्यात ८ हजार रुपये
घेण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत
विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पथकाने सापळा
रचला होता. एसीबीने ही लाच घेताना एजंटला बशिरगंज
चौकात रंगेहात पकडले.
No comments:
Post a Comment