आमराई परिसरातील अपुऱ्या मूलभूत सुविधाची कामे त्वरित करण्याची आरपीआय ची मागणी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, June 19, 2025

आमराई परिसरातील अपुऱ्या मूलभूत सुविधाची कामे त्वरित करण्याची आरपीआय ची मागणी..

आमराई परिसरातील अपुऱ्या मूलभूत सुविधाची कामे त्वरित करण्याची आरपीआय ची मागणी..
बारामती:दि.19/6/2025 रोजी बारामती शहरातील विशेषतः आमराई परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित समस्या लक्षात घेत त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात.अशा प्रकारच्या मागण्यांचे स्मरणपत्र तसेच लेखी निवेदन मा.पंकजजी भुसे (मुख्याधिकारी बा.न.प) यांना देण्यात आले.सदर स्मरणपत्रामध्ये तसेच लेखी निवेदनामध्ये प्रामुख्याने खालील मागण्यांचा समावेश होता.
1)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम फेज 4 मधील नगर परिषदेच्या मालकीच्या बंद अवस्थेतील गाळ्यांचे फेर लीलाव करण्यात यावेत.
2)बारामती शहरातील विशेषतः आमराईतील उर्वरित झोपडपट्टी परिसरात सुरक्षेची योग्य ती काळजी घेऊन अंतर्गत ठिकाणी विद्युत खांब बसविण्यात यावेत.
3) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम मधील संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून 24 तास सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत.
4)भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम मधील व्यायामशाळेस अत्याधुनिक व्यायाम साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे.
5)आमराई येथील विहिरीची दुरुस्ती करून परिसरातील होणारा अनियमित पाणीपुरवठा नियमित करण्यात यावा.
7)अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांच्या वस्त्यातील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण,सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे.
8) बस स्टँड समोरील परिसर प्रबुद्धनगर तसेच वडकेनगर येथील लहान बालकांसाठी शौचालय (बेबी सीट्स टॉयलेट्स)बांधून मिळावेत.
9)शहरातील बेकायदेशीर वृक्ष तोडीचा पंचनामा करून संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.उपरोक्त मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षामार्फत आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
याप्रंगी रत्नप्रभा ताई साबळे (उपाध्यक्षा म.आघाडी प.महाराष्ट्र),रविंद्र(पप्पू)सोनवणे (युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा RPI आठवले),मोईन बागवान (पत्रकार).अमर(भैया)भंडारे,महंमद(भाई)शेख,गणेश मागाडे, निलेश शेंडगे,अमोल घाडगे आदी सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment