लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी कैद्याने घेतला गळफास..
नाशिक(प्रतिनिधी):- कारागृहात शिक्षा
भोगत असलेल्या एका आरोपी कैद्याने गळफास
घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.आत्महत्या करणाऱ्या कैद्याचे नाव शिवदास भालेराव (वय 58, कैदी क्रमांक यूटी-802) असे आहे,तो सिन्नर तालुक्यातील रहिवासी आहे. त्याने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्याचीच तो जून २०२४ पासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आपली शिक्षा भोगत होता.शिवदास भालेराव याने रविवारी दुपारच्या सुमारास कारागृहातील एका ठिकाणी कश्याच्या तरी साहाय्याने
गळफास घेतल्याचे कारागृह प्रशासनाच्या लक्षात आले.याची माहिती मिळताच कारागृहातील पोळी अमलदारांनी तातडीने त्यांना खाली उतरवून शासकीय जिल्हा रुग्णालयात सव्वा तिच्या सुमारास दाखल केले. मात्र तेव्हा वैधकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून कैद्याला मृत
घोषित केले.पोलीस तपास सुरु या घटनेची माहिती नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात
मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. पोलीस आणि कारागृह प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment