बारामती:-बारामतीत अपघाताचे सत्र चालूच असून भरधाव व दारू पिऊन चालविणाऱ्या वाहन चालकांवर कसलेही कायद्याचा धाक राहिला नसल्याचे बोलले जात असून,बड्या घरची व ज्यांचं कसलच अस्तित्व नाही असे भुरटे दुसऱ्यांच्या गाड्या आपल्याच बापाचं असल्यागत बेजबाबदार व दारू पिऊन भरधाव वेगाने वाहने चालविली जात असल्याचे अनेक उदाहरणे आहेत.नुकताच पाटस रोड झगडे पेट्रोल पंपाच्या समोरच्या रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या फोर व्हीलर गाडीने रस्त्यावरच्या लोकांच्या जीवितास धोका होईल असे बेजबाबदार पणाने मधंधुंद अवस्थेत गाडी चालविली हे प्रत्यक्ष दर्शी पाहणाऱ्यांचा काळजाचा ठोका चुकल्या सारखं जाणवले इतक्या भरधाव वेगाने चालविल जाणार वाहन अंगावर काटा आणणारा होता असे येथे उपस्थित असणाऱ्यांनी सांगितले या अपघाताचे cctv फुटेज पाहिल्याने
लक्षात येईल रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या टूव्हीलर वाला व्यक्ती स्वतःचा जीव कसा वाचवितोय हे व्हिडीओ मध्ये
पहावयास मिळते, तात्काळ याठिकाणी नागरिकांनी या गाडी चालकास पकडले व 112 ला फोन करून पोलिसांना कळविले असे या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी सांगितले त्यानंतर पोलीस आले व त्यांनी क्रेन च्या साह्याने गाडी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन गेले पुढे उपलब्ध फिर्यादीनुसार गौरव विश्वास ठोंबरे पो.कॉ.ब.बारामती शहर पोलीस स्टेशन यांनीसमक्ष बारामती शहर पोलीस स्टेशन येथे हजर राहुन फिर्यादी जबाब लिहुन दिला की, दिनांक 31/10/2025 रोजी 10/00 ते 20/00 वा. चे दरम्यान मी तसेच पो.हवा. वणवे असे बारामती शहर पोलीस स्टेशन येथे डायल 112 डयूटी वर असताना व पाटस रोड येथे सायकाळी 17/00 वा.चे.सु ।! पेट्रोलींग करीत असताना सराफ पेट्रोल पंप येथे आलो असता बारामती बाजुकडून पाटस बाजुकडे एक हयुदाईवेरना कार एम.एच. 01 डी.बी. 0883 ही त्यावरील चालक हा भरधाव वेगात वाकडी तिकडी चालवित घेवून येताना दिसला आम्हाला तिचा संशय आल्याने मी तसेच सोबतचे पोलीस स्टाफ यांनी त्यास हात करून थांबवले वचालकास खाली उतरण्यास सांगितले त्याचेकडे गाडीची कागदपत्रे व लायसन्सची विचारपूस करीत असताना त्याचे तोंडाचा आंबट व उग्र वास आल्याने त्यास दारू पिला आहे काय असे विचारले असता त्याने हो असे उत्तर दिल्यानेत्यास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव संकेत शिवाजी जांबले वय 21वर्ष रा. वांसुदे ता. दौड जि. पुणेअसे सांगितले त्यांनतर त्यास ताब्यात घेवून पोलीस ठाणे अंमलदार बारामती शहर पोलीस स्टेशन याचे समक्ष हजरकेले असता त्यांनी नमुद चालकाची वैदयकीय तपासणी करणे कामी सरकारी दवाखान्याची मेडीकल यादी देवूनत्याची वैदयकीय तपासणी करून आणणेबाबत मुखजल आदेश दिल्याने त्यांची वैदयकीय तपासणी करून घेतलीअसता तो मादक द्रव्याचे अंमलाखाली असल्याचे मा. वैदयकीय अधिकारी सिल्व्हर ज्युबली हॉस्पीटल बारामतीयांनी प्रमाणपत्र दिले आहे त्यामूळे त्याने मादक द्रव्याचे सेवन करून वाहन चालविले आहे म्हणून माझी त्याचे विरूध्दमोटार वाहन कायदा कलम 185 प्रमाणे सरकार तर्फे कायदेशीर फिर्याद आहेतरी दिनांक 31/10/2025 रोजी 17/00 वा.चे.सु ।। पाटस रोड सराफ पेट्रोल पंपा जवळ बारामती जि.पुणे येथे इसम नामे संकेत शिवाजी जांबले वय 21 वर्ष रा. वांसुदे ता. दौड जि. पुणे हा आपले ताब्यातील हयुदाईवरना कार एम. एच. 01 डी.बी. 0883 ही दारू पिवून भरधाव वेगात वाहन चालवित असताना मिळून आला म्हणूनमाझी त्याचे विरूध्द मोटार वाहन कायदा कलम 184, 185 प्रमाणे सरकार तर्फे कायदेशीर फिर्याद अमलदार पो हवा मोरे यांनी दाखल केला आहे.
Post Top Ad
Saturday, November 1, 2025
Home
ताज्या घडामोडी
बारामती
बारामतीत मधंधुंद अवस्थेत भरधाव वेगाने गाडी चालविणे बेतते जीवावर, कडक कारवाईची मागणी...
बारामतीत मधंधुंद अवस्थेत भरधाव वेगाने गाडी चालविणे बेतते जीवावर, कडक कारवाईची मागणी...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment