धक्कादायक..भंडाऱ्याचा भडका,नुकताच निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविकांसह 16 जण गंभीर जखमी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, December 21, 2025

धक्कादायक..भंडाऱ्याचा भडका,नुकताच निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविकांसह 16 जण गंभीर जखमी..

धक्कादायक..भंडाऱ्याचा भडका,नुकताच निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविकांसह 16 जण गंभीर जखमी..
जेजुरी :- पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर विजयी
जल्लोष करताना अत्यंत दुर्दैवी घटना घडली
आहे. जेजुरीच्या पायरीवर भंडारा अर्पण
करताना अचानक भडका उडाला आणि त्यात
16 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती
आहे. जेजुरीत मतमोजणी संपल्यानंतर विजयी
जल्लोषाला शोकाची छाया पडेल, अशी
धक्कादायक घटना जेजुरीत घडली. खंडोबा
गडाच्या पहिल्या पायरीवर भाविक व
कार्यकर्त्यांनी भंडारा अर्पण करताना अचानक
भीषण भडका उडून किमान 16 जण गंभीर
भाजल्याची घटना दुपारी सुमारे 3 वाजता
घडली. जखमींमध्ये दोन नव्याने निवडून
आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकांसह
अनेक महिला, तरुणांचा समावेश आहे. घटनेनंतर परिसरात मोठी दहशत निर्माण झाली. क्षणभरात भंडाऱ्याने पेट घेतला आणि
जोरदार आवाजासह स्फोट होऊन आजूबाजूचे
लोक होरपळले. भाजलेल्या जखमींना तातडीने
जेजुरीतील खाजगी तसेच शासकीय
रुग्णालयात दाखल करण्यात आले असून
काहींना पुढील उपचारासाठी पुण्यात
हलविण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत
तपास सुरू केला आहेमल्हार नाट्यगृहात
मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर होताच
राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार, समर्थक व
कार्यकर्ते खंडोबाच्या दर्शनासाठी गडाच्या
पहिल्या पायरीवर गेले होते. येथे भाविकांनी
मोठ्या प्रमाणावर भंडारा उधळताना
वापरलेल्या भंडाऱ्याने अचानक पेट घेतला.
अत्यंत ज्वालाग्राही घटक मिश्रित असल्यामुळे
भडका एकदम मोठा झाला आणि अनेक जण
त्यात सापडले. स्फोटासारखा आवाज
झाल्यानंतर क्षणात परिसर धुराने व्यापला.
काही काळासाठी तिथे प्रचंड घबराट पसरली
होती. घटना अतिदुर्दैवी, भेसळयुक्त भंडाऱ्यावर
कठोर कारवाई करणार असल्याचे नव्या
नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी सांगितले.
निवडून आलेले नगराध्यक्ष जयदीप बारभाई
म्हणाले, गडाच्या पहिल्या पायरीवर घडलेली
दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. ज्वालाग्राही आणि
भेसळयुक्त भंडाऱ्याचा वापर झाल्यामुळे भडका
उडाल्याची स्पष्ट शक्यता आहे. पुढील काळात
शहरात विक्री होणाऱ्या अशा भेसळयुक्त
भंडाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.

No comments:

Post a Comment