जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 12, 2026

जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी 
बारामती:(प्रतिनिधी):-
बारामती तालुका मराठा सेवा संघ यांच्या वतीने जिजाऊ भवन येथे सोमवार दि १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी प्रांताधिकारी वैभव नावडकर,तहसीलदार स्वप्नील रावडे ,बारामती बँक माजी  उपाध्यक्ष किशोर मेहता, ह. भ.प.रामानंद महाराज पंढरपूरकर,  बारामती इंडस्ट्रियल  डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार  आदी मान्यवर व  बारामती तालुका मराठा सेवा संघ व जिजाऊ सेवा संघ चे अध्यक्ष व विश्वस्त  व विविध क्षेत्रातील मान्यवर  व शिवप्रेमी उपस्तीत होते.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती  ह.भ.प.रामानंद महाराज पंढरपूरकर यांनी दिली.
श्रीमती लीलाबाई जालिंदर शेंडगे यांना सामाजिक बांधिलकी म्हणून आर्थिक मदत मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
 जिजाऊ वंदना जिजाऊ सेवा संघ च्या महिलांनी सादर केली व जिजाऊ करिअर सेंटर च्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षा साठी विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जिजाऊ शिष्यवृत्ती देत असल्याबद्दल मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.


No comments:

Post a Comment