मानव अधिकार संरक्षण समितीचे महिला पोलीस कर्मचारीची आठ तासाची ड्युटी सह इतर मागण्याचे निवेदन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 9, 2026

मानव अधिकार संरक्षण समितीचे महिला पोलीस कर्मचारीची आठ तासाची ड्युटी सह इतर मागण्याचे निवेदन..

मानव अधिकार संरक्षण समितीचे महिला पोलीस कर्मचारीची आठ तासाची ड्युटी सह इतर मागण्याचे निवेदन..       फलटण:- फलटणचे तहसीलदार डॉ अभिजीत जाधव यांना दि.09/01/2026 रोजी
यांना निवेदन पत्र देण्यात आले, महाराष्ट्र शासनाने महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस कर्मचारी यांची ड्युटी आठ तासाची करावी,तसेच महिला पोलीस कर्मचारी त्यांची ड्युटी ही दिवसांमध्ये असावी अशी मागणी मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली फलटण सातारा  याच्या वतीने करण्यात येत आहे,अशी मागणी  मानवाधिकर संरक्षण समितीचे राज्याचे जनसंपर्क अधिकारी श्री. गजानन भगत आणि  फलटण तालुका.  अध्यक्ष सुरत चव्हाण पाटील व  महिला फलटण तालुका अध्यक्ष सौ.प्रिती भोजने यांच्या कमिटीच्या  वतीने  देण्यात आले आहे.पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थाच्या विचार करण्याची गरज आहे. पोलिसांनाही योग्य विश्रांतीची गरज आहे. चोवीस चोवीस तास सतत ड्युटी केल्यामुळे पोलिसांचे आरोग्य बिघडले जात आहे. तरी शासनाने पोलिसांची ड्युटी आठ तासाची करण्याचा निर्णय घेण्याची मागणी मानवाधिकर चे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान दाठिया यांनी पत्रकाद्वारे केली आहे. महाराष्ट्र पोलीस खात्यातील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी व पोलीस दलातील महिला अधिकारी व कर्मचारी वर्ग अतिशय कर्तव्यदक्ष प्रामाणिक पणे जिवाची पर्वा नकर्ता कर्तव्य बजावत असतात. आपल्या कुटुंबासोबत कुठल्याही परिस्थितीत कोणताही सण आणि इतर सुखाचा वेळ देऊ शकत नाहीत. पोलिसांना २४ तास सतत जनसेवेसाठी सज्ज रहावे लागते. पोलीस दलातील अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत कर्तव्यनिष्ठ असतात आम्ही. सामाजिक कार्यकर्ते असल्याने अनेक वेळा पोलिस बांधवांशी आमचा संपर्क आला आहे, आमच्या मनामध्ये पोलिस बांधवांनबाबत आदर आहे. पोलिसांनी जनतेला रात्रंदिवस तत्पर सेवा मिळावी म्हणून अनेक पथकेही स्थापन केली आहेत. उदा महिलांसाठी दामिनी पथक जेष्ठ नागरीकांसाठी, लहान मुलांसाठी, वाहतुकीसाठी सतर्क अशा विविध अनेक जनतेच्या सेवेसाठी सुविधा उपलब्ध केले आहेत. पोलीस बांधव चोवीस तास इतके प्रामाणिक पणे काम करीत असताना सुद्धा समाजातील काही लोक पोलिसांकडे अतिशय संशयी नजरेने पाहत असतात. समाजातील अशा लोकांनी पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. अति ताणामुळे पोलिसांचे मानसिक आरोग्य बिघडत असते. अशा परिस्थितीत त्याना कुटुंबियांना जास्त वेळ देता येत नाही त्यामुळे पोलिसांची ड्युटी आठ तासाची असावी म्हणजे ते आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देतील, पोलिसांमुळे जनता सुरक्षित आणि सुखरूप आहे पण पोलिसच असुरक्षित आहे. त्यामुळे पोलिसांची ड्युटी आठ तासाची असावी अशी मागणी फलटण तालुका सातारा जिल्हा मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली यांनी या पत्रकाद्वारे केली आहे.फलटण तालुका अध्यक्ष. सौ. प्रीती संजय भोजने.फलटण तालुका उपाध्यक्ष  सुरेखा योगेश गोफणे   फलटण तालुका सचिव  सौ. तेजश्री संतोष जाधव.श्री.निलेश भराडे सर 
श्री. विश्वास कदम फलटण तालुका कमिटी यांनी दिले त्याच माहिती साठी प्रत.१) मा.  आचार्य देवव्रत  (महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल)
२) मा. देवेन्द्रजी फडणवीस (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)
३) मा. एकनाथजी शिंदे साहेब (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)
४) मा. अजित दादा पवार (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)
५) मा. सदानंद दाते  (पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य)यांना निवेदन दिले.

No comments:

Post a Comment