बारामतीत अवैध धंद्यांना बसला आळा..कारवाईसाठी पोलीस यंत्रणा झाली सज्ज...। - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 3, 2026

बारामतीत अवैध धंद्यांना बसला आळा..कारवाईसाठी पोलीस यंत्रणा झाली सज्ज...।

बारामतीत अवैध धंद्यांना बसला आळा..कारवाई साठी पोलीस यंत्रणा झाली सज्ज...।                                                     बारामती:-बारामतीत नुकताच झालेल्या दुःखद घटनेमुळे व महाराष्ट्राचा लाडका दादा यांचे दुःखद निधन झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून कधीही विसरू न शकणारे अजितदादाचे काम,त्यांच्या प्रत्येकाशी असणारा जिव्हाळा सदैव आठवणीत राहणारा आहे.त्यांचे जाण्याने बारामतीत शोककळा पसरली असून त्यांच्या अस्थीकलश प्रत्येक भागातून नागरिकांना दर्शन घेण्यासाठी येत आहे.बारामतीत वातावरणात दुःखद मय झाले आहे.तर दुसरीकडे पोलीस यंत्रणा आपले काम करीत असताना बारामती शहर व बारामती तालुक्यातील अवैध धंदे मात्र त्यांनी पूर्ण बंद केले आहे, कुठेही असे धंदे चालू नसून पोलीस यंत्रणा सक्रिय झाली असून तात्काळ कारवाई करीत असून यापुढे हे अवैध धंदे बंदच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अवैध दारू, जुगार, मटका,ऑनलाइन मटका, लॉटरी,गांजा विक्री,ताडी, हातभट्टी, लिकर,गुटखा विक्री असे अवैध धंदे बंद करण्याचा सपाटा लावला असून ते चालू देणार नसल्याचे सांगण्यात येत आहे, असे आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा निर्णय पोलिसांनी घेतल्याने जनतेने याबाबत समाधान व्यक्त केले असले तरी बारामतीच्या जनतेसाठी पोलिसांनी घेतलेला निर्णय असाच कायम राहू द्यावा ही मागणी प्रामुख्याने होत आहे.

No comments:

Post a Comment