भाजप जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष पदी खलील काझी यांची नियुक्ती.. बारामती :-बारामती तालुक्यातील मा. खलील इस्माईल काझी बारामती आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचे काम अतिशय चांगल्या पध्दतीने करीत असल्यामुळे याची दखल घेऊन भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण (दक्षिण) या कार्यकारिणीमध्ये 'जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष” पदी निवड करण्यात आली आहे. यासाठी त्यांना मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आल्या, आपल्या पदाचा उपयोग जिल्ह्यातील पक्ष संघटन वाढीसाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी होईल हिच अपेक्षा ठेवून त्यांना हे नियुक्ती पत्र भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ग्रामीण (दक्षिण )चे अध्यक्ष चंद्रशेखर अशोकराव वढणे
यांनी दिले.
No comments:
Post a Comment