अवैध रित्या हत्यारे बाळगणारे अकरा इसमांना ताब्यात घेवून सहा गावठी पिस्तुल व सहा जिवंत काडतूसे, बारा तलवार असा मुद्देमाल हस्तगत... बारामती :- स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणची कामगिरी विशेष मोहिम दरम्यान सात दिवसांत वेगवेगळया ठिकाणी कारवाई करून अवैध रित्या हत्यारे बाळगणारे अकरा इसमांना ताब्यात
घेवून सहा गावठी पिस्तुल व सहा जिवंत काडतूसे, बारा तलवार असा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे.
अवैध रित्या गावठी पिस्तुल, कट्टा बाळगून त्याचा वापर करून गुन्हे करण्याचे प्रमाण वाढले असल्याने अशा इसमांवर
कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक साो पुणे ग्रामीण यांनी स्था. गु.शा. चे अधिकारी व अंमलदार यांना दिले.
त्यांची विशेष बैठक घेवून अवैध गावठी पिस्तुल बाळगणारे इसमांवर तसेच ज्या गुन्हयात गावठी पिस्तुलाचा वापर झालेला असून त्या
गुन्हयातील पाहिजे आरोपी यांना ताब्यात घेणेकामी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम आखण्यात आली.
संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करणेबाबत तपास पथकांना आदेशीत करणेत आले.
दि. २६/०३/२०२६ रोजी उरूळी कांचन पो स्टे हद्दीत शिंदवणे गावचे हद्दीत काळेशिवार परिसरात रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार हे
त्यांचेजवळ गावठी पिस्तुल बाळगून गुन्हेगारी दहशत निर्माण करत असल्याचे बातमी स्था. गु.शा. चे पथकाला मिळाली होती, त्या आध
सापळा रचून आरोपी १) रियाज हुसेन मुलानी वय ३० वर्षे, रा. उरुळी कांचन बगाडे मळा, ता हवेली, जि-पुणे २) इकबाल शमीम
खान वय ३१ वर्षे, रा.तुपे वस्ती जिल्हा परिषद शाळेजवळ, उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे यांना स्था.गु.शा. चे पथकाने
ताब्यात घेऊन त्यांचे कडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ४०,२००/- रू. चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
त्याबाबत उरुळी कांचन पो स्टे. गु.र.नं. ६६ / २०२६ आर्म अॅक्ट ३, २५ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे.
दि. २६/०३/२०२६ रोजी वडगाव निंबाळकर पो स्टे हद्दीत निंबुत परिसरात आरोपी नामे वैभव रघुनाथ फडतरे वय ३० वर्षे रा.
क्षेत्र माऊली, बालाजी कॉलनी, सातारा हा त्याचे कंबरेला गावठी पिस्तुल लावून परिसरात फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने त्यास
ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल दोन जिवंत काडतूस असा एकूण ५०,२००/- रू. चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
त्याबाबत वडगाव निंबाळकर पो.स्टे. गु.र.नं. ५६ / २०२६ आर्म अॅक्ट ३, २५ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आला आहे.
दि. २६/०३/२०२६ रोजी दौंड पो स्टे हद्दीत हुतात्मा चौकात आरोपी नामे १) इरफान ऊर्फ शेरखान शब्बीर खान वय २२ वर्षे,
२) विशाल प्रकाश काटकर वय ३० वर्षे दोघे रा. कुंभार गल्ली दौंड, ता. दौंड जि. पुणे यांचे जवळ गावठी पिस्तुल असल्याची बातमी
पथकाला मिळाली होती, त्या बातमीचे आधारे पथकाने त्या दोघांना ताब्यात घेवून त्यांचेकडून एक गावठी पिस्तूल कि.रू. ८०,०००/-
रू. चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याबाबत दौंड पो.स्टे. गु.र.नं. ९८९ / २०२६ आर्म अॅक्ट ३,२५ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आला आहे.
सदर गुन्हयातील जप्त केलेले अवैध पिस्तुल हे आरोपींनी ज्या आरोपींकडून घेतले आहे, त्या दोन्ही आरोपी नामे, ३) पद्माकर शांताराम
ताडे वय ३४ वर्षे, रा. कुंभार गल्ली, दौंड, ता. दौंड, जि. पुणे ४) बब्या ऊर्फ भोजराज विजय जमदाडे, वय २५ वर्षे, रा. भैरवनाथ
गल्ली, दौंड ता. दौंड जि. पुणे यांना देखील अटक करणेत आली आहे.
दि. ३०/०३/२०२६ रोजी वेल्हा पो. स्टे. हद्दीत गोवंडी गावचे हद्दीत आरोपी नामे १) गणेश यशवंत धरपाळे वय ३२ वर्षे रा.
वांजळे पो. दापोडे, ता. राजगड (वेल्हा), जि. पुणे हा त्याचेजवळ गावठी पिस्तुल बाळगून वेल्हा बाजूकडे जात असल्याची पथकाला
मिळाली होती, त्या माहितीचे आधारे त्यास सापळा लावून ताब्यात घेतले असता, त्याचेजवळ एक गावठी पिस्तुल व एक जिवंत
काडतूस असा एकूण ३५,२००/- रू. चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याबाबत वेल्हा पो.स्टे. गु.र.नं. २४ / २०२६ आर्म अॅक्ट ३,२५
प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आला आहे.
उरूळीकांचन पो स्टे गु.र.नं. ४१/२०२६ बी. एन. एस. १०९, ३(५) आर्म अॅक्ट ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयात
दोन आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने फिर्यादी हा त्याचे चायनीजचे दुकानावर असताना त्याचेवर फायरींग केली
होती, गुन्हा केल्यानंतर आरोपी पळून गेले होते. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी त्या आरोपींचे शोधासाठी स्था. गु.शा. व उरुळीकांचन
पोस्टे चे संयुक्त पथक नियुक्त केले होते, पथकाने आरोपींबाबत गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळवून आरोपी नाशिक मार्गे गुजरात
राज्यात पळून जात असताना, सिन्नर तालुक्यातील पांडुर्ली गावचे परिसरातून आरोपी १) संग्राम हरिश्चंद्र हुलगे वय १९ वर्षे रा.
एम.जी.रोड, उरुळी कांचन ता. हवेली जि.पुणे २) सिद्धार्थ गोविंद कांबळे वय २८ वर्षे, रा. कोरेगाव मुळ, ता. हवेली जि.पुणे यांना
ताब्यात घेण्यात आले, आरोपींकडून दोन गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस हस्तगत करणेत आलेले असून दोन्ही आरोपी सध्या
न्यायालयीन कोठडी मध्ये आहेत.दि. २८/०३/२०२६ रोजी जुन्नर विभागातील स्था. गु.शा. चे पथक हे नारायणगाव पो स्टे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पुनम
चौकाजवळ एक संशयित कार उभी असून त्या कार मध्ये तलवार असल्याची बातमी पथकाला मिळाली होती, त्या माहितीचे आधारे
पथकाने सापळा लावून कार चालक आरोपी नामे १) सालीम साजीद पठाण वय २० वर्षे रा. शिपाई मोहल्ला, जुन्नर ता. जुन्नर जि. पुणे
यास ताब्यात घेवून तपासणी केली असता, कारमधून एकूण १२ तलवारी हस्तगत करणेत आल्या असून त्या तलवारी अवैध रित्या
बाळगल्या असताना तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून कायदेशीर कारवाई करत नारायणगाव पो. स्टे. गु.र.नं. ६० / २०२६ आर्म
अॅक्ट ४,२५ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस
अधिकारी व अंमलदार यांनी राबविणेत आलेल्या विशेष मोहिम अंतर्गत सात दिवसांत कारवाई करून एकूण ११ आरोपींना ताब्यात
घेवून ६ गावठी पिस्तुल, ६ जिवंत काडतुसे, १२ तलवारी असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साो.
ग्रामीण, मा. अ.पो. अधीक्षक श्री. रमेश चोपडे साो.
पुणे विभाग, मा. अ.पो. अधीक्षक श्री. गणेश बिरादार साो. बारामती विभाग, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी साा, पुणे ग्रामीण यांचे
मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, ऊरुळी कांचन पो स्टे चे पो. नि. सचिन वांगडे, स्था.गु.शा.चे
सपोनि महादेव शेलार, सपोनि कुलदीप संकपाळ, सपोनि राहुल गावडे, सपोनि दत्ताजीराव मोहिते, वडगाव निंबाळकर पो.स्टे. चे सपोनि
नागनाथ पाटील, स्था.गु.शा. चे पोसई अभिजीत सावंत, पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे,
निलेश सुपेकर, अक्षय नवले, राजू मोमीण, अतुल डेरे, श्रेणी पोसई बाळासाहेब कारंडे, श्रेणी पोसई विनोद भोकरे, मंगेश थिगळे,
भाऊसाहेब पुंड, बाळासाहेब खडके, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, योगेश नागरगोजे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल
अहिवळे, निलेश शिंदे, अजय घुले, रामदास बाबर, अमोल शेडगे, मंगेश भगत, सागर नामदास, तुषार भोईटे, भारत मोहोळ, गणेश धनवे,संतोष भापकर, अभिमन्यु मोटे, राहूल पवार, रणजित कोंडके, धिरज जाधव, नंदा कदम, शरयु बिरंबोळे, मुकुंद कदम वडगाव निंबाळकर
पोस्टे चे अंमलदार पोपट नाळे, हृदयनाथ देवकर यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment