बारामती :-बारामती वकील संघटनेने *न्यायमंदिर चषक २०२६* राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेले होते. सदरील स्पर्धेचे उदघाटन अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश
मा. व्ही.सी. बर्डे साहेब यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती येथे झाले.सदरील स्पर्धेकरिता महाराष्ट्रातुन पुणे,महाड,मावळ,राजगुरूनगर,जुन्नर, कराड,सातारा,अहिल्यानगर,राहता,फलटण,वाई, दहिवडी,माळशिरस, पिंपरी चिंचवड,दौंड,इंदापूर येथील संघ दाखल झाले होते.
सदरील स्पर्धेत बारामतीच्या दोन महिला क्रिकेट संघांनी देखील उत्स्फूर्तपने सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेदरम्यान युवा नेते जय दादा पवार,युगेंद्र दादा पवार,नगराध्यक्ष सचिनशेठ सातव व इतर विद्यमान नगरसेवक हे सर्व खेळाडूना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्याकरीता उपस्थित होते.
सदरील स्पर्धेमध्ये अतिशय रोमहर्षक असे सामने झाले त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक माळशिरस संघाने पटकावले, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक बारामती A टीम या संघाला मिळाले, तसेच तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्रीकांत पन्हाळे 11 सातारा या संघाला मिळाले व चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक अहिल्यानगरसंघाला मिळाले.
मॅन ऑफ द मॅच फायनल- तन्मय देव माळशिरस*
*मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार - शक्ती माने माळशिरस*
*बेस्ट बॅट्समन ऑफ द सिरीज-शक्ती माने माळशिरस*
*बेस्ट बॉलर ऑफ द सिरीज- डी.एस माने माळशिरस*
*बेस्ट फिल्डर-अनुराग खाडे बारामती*
या सामन्याचे युट्युब लाईव्ह प्रेक्षपण केलेले होते.सर्व सामने व्यवस्तीत पार पाडण्याकरिता बारामती येथील सिनियर वकील,ज्युनिअर वकील,बारामती वकील संघटनेची कार्यकारिणी व क्रिकेट कमिटी च्या सर्व सदस्यांची मोलाची साथ मिळाली,बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.प्रसाद खारतुडे यांनी प्रास्ताविक केले,क्रिकेट कमिटी चे अध्यक्ष ॲड. योगेश राऊत यांनी आभार मानले व ॲड समीर शेख यांनी सूत्रसंचालन केले.
No comments:
Post a Comment