पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त 'रक्तदान शिबीर' या उपक्रमात 321 बाटल्यांचे संकलन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 30, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त 'रक्तदान शिबीर' या उपक्रमात 321 बाटल्यांचे संकलन..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त  'रक्तदान शिबीर' या उपक्रमात 321 बाटल्यांचे संकलन..         
बारामती :- पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती  या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त  'रक्तदान शिबीर' आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाला एकूण 321 बाटल्यांचे संकलन करण्यात आले आपण सर्वांनी मिळून जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून ऋणी आहे.
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे, या भावनेने तुम्ही या शिबिरात सहभागी होऊन केवळ रक्त दिले नाही, तर अनेकांना जीवदान मिळवून देण्यासाठी सहकार्य केले आहे. रक्ताची गरज असलेल्या गरजू रुग्णांना मदत करण्याच्या या उदात्त कार्यात आपला सहभाग खरोखरच अमूल्य आहे.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष रक्त दिले, तसेच ज्यांनी या शिबिराच्या नियोजनात आणि व्यवस्थापनात  मेहनत घेतली, त्या सर्व स्वयंसेवकांचे, डॉक्टर आणि त्यांच्या टीमचे मी विशेष आभार मानतो. तसेच, ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या उपक्रमाला प्रसिद्धी मिळवून दिली आणि सहकार्य केले, अशा सर्वांचेच योगदान मोलाचे आहे.
आपल्या या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!

आपलाच-: श्री नंदकुमार नानासो कोकरे (प्रशासकीय अधिकारी)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोच्च रुग्णालय बारामती.

No comments:

Post a Comment