धक्कादायक..सुरक्षारक्षकाचा ४ मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न;सुरक्षारक्षक पोलिसांच्या ताब्यात. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 9, 2026

धक्कादायक..सुरक्षारक्षकाचा ४ मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न;सुरक्षारक्षक पोलिसांच्या ताब्यात.

धक्कादायक..सुरक्षारक्षकाचा ४ मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न;सुरक्षारक्षक पोलिसांच्या ताब्यात.
पुणे :- पिंपरी-चिंचवडमध्ये ४ चिमुरड्यांवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला असल्याचे कळतंय तर सुरक्षारक्षक पोलिसांच्या ताब्यात असून पिंपरी-चिंचवडमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे.एका सुरक्षारक्षकाने संतापजनक प्रकार केल्याचे समोर आलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला. सोसायटीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या एका सुरक्षारक्षकानेच चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. एका १० वर्षांच्या मुलीने दाखवलेल्या धैर्यामुळे हा आता गजाआड झालाय.मिळालेल्या माहितीनुसार,सोसायटीत शांतता असताना
शुक्रवारी दुपारी आरोपी दिनेश याने १०, ८, ६ आणि ८ वर्षे वयोगटातील चार मुलींना टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो असे आमिष दाखवलं. त्यानंतर त्यांना सातव्या मजल्यावर नेलं. तिथे त्याने या मुलींशी अश्लील चाळे करत त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केलाय. टेरेसवरील प्रकार कोणाला सांगितला तर जिवंत मारून
टाकेन, अशी धमकीही त्याने दिली होती.आरोपी सुरक्षारक्षकाच्या धमकीमुळे मुली प्रचंड घाबरल्या होत्या.मात्र,त्यातील १० वर्षांच्या एका मुलीने हिंमत न हारता घरी पोहोचताच आईला सर्व आपबिती सांगितली. पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली.सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आल्याचं कळत आहे.

No comments:

Post a Comment