खळबळजनक..पुनः एकदा लव जिहाद; कुटुंबीयांना मारहाण करून 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोन्या सह पिस्तूलचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण..
बोरीभडक :-नुकताच मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे एका तरुणाने तरुणीचे अपहरण करून तिच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात कमरुद्दीन मुकीम शेख आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध भा न्या सं कलम 74, 79, 309(2),333, 115(2), 338, 351 (2), 3(5) सह आर्म अॅक्ट
कलम 3 (25) या कलमांन्वये लव जिहाद प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी (वय 23) हिला हडपसर येथील कमरुद्दीन मुकीम शेख ( सय्यद नगर, हडपसर) हा गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता, त्यामुळे तिला वडील ***** यांनी घरून बाहेर जाण्यास मनाई केली होती. २ जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 च्या सुमारास कमरुद्दीन अचानक पवार यांच्या घरात शिरला. त्याने पीडितेला जबरदस्तीने ओढत नेण्यास सुरुवात केली. यावेळी **** *** यांच्या पत्नीने आणि वडिलांनी पीडितेला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने पिस्तूल दाखवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.तसेच, वृद्ध आजोबांना तसेच **** *** यांना धक्काबुक्की करत मारहाण केली.आरोपीने **** यांच्या पत्नीला लाथ मारून अश्लील शिवीगाळ केली आणि लज्जास्पद वर्तन केले. एवढेच नाही, तर नर्सरीच्या व्यवहारासाठी ठेवलेले 5,01,500 रुपये रोख आणि सात तोळे वजनाचे सोन्याचे गंठणही जबरदस्तीने चोरून नेले.तसेच आरोपीने पीडितेला बाहेर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात बसवून तिचे अपहरण केले.यावेळी त्याच्यासोबत आणखी दोन अनोळखी इसम होते.अशी तक्रार केली असून पोलीस अधिक तपास करीत आहे.
No comments:
Post a Comment