धक्कादायक...प्रेमविवाहा नंतर सुखी संसाराला लागली नजर;पतीच्या विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पत्नीने संपवलं जीवन..
बारामती :-महिलेने आपल्या नवऱ्यासोबत प्रेमविवाह करून सुखी संसार मग्न असताना त्यांच्या संसाराला नजर लागली आणि 25
वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवले.ही घटना पुण्यात घडली आहे.या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी मृत तरुणीच्या पतीला अटक केली असून, त्याची प्रेयसी आणि पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की,वृषाली भीमराव आरडे ऊर्फ वृषाली रोहित घोडे (वय 25)असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पती रोहित मच्छिंद्र घोडे आणि त्याची प्रेयसी तृप्ती वाकचौरे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. वृषालीची आई लक्ष्मी आरडे (रा. इंदापूर) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली आहे,याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वृषाली आणि रोहित यांनी सप्टेंबर 2021 मध्ये प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही काळ बारामती येथे राहिल्यानंतर ते दोघेही नोकरी आणि उदरनिर्वाहासाठी पुण्यात शिफ्ट झाले. मागील दोन वर्षांपासून ते उरुळी देवाची येथील 'वैष्णव सिटी' परिसरात भाड्याने राहत होते. रोहित हा'डी-मार्ट'मध्ये (D-Mart) नोकरी करत होता.ऑफिसमधील प्रेमसंबंध आणि वाद रोहित डी-मार्टमध्ये कामाला असताना तिथेच काम करणाऱ्या तृप्ती वाकचौरे नावाच्या तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. पतीच्या या विवाहबाह्य संबंधांची माहिती जेव्हा पत्नी वृषालीला मिळाली, तेव्हापासून त्यांच्या सुखी संसाराला नजर लागली.या कारणावरून गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते.पतीच्या सततच्या त्रासाला आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर 27 जून रोजी वृषालीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच फुरसुंगी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांना मृत वृषालीच्या मोबाईल फोनमध्ये तिने लिहिलेली एक चिठ्ठी
आढळून आली आहे. या चिठ्ठीमध्ये तिने आपल्या मृत्यूला पती रोहित आणि त्याची प्रेयसी कशी जबाबदार आहेत, याचा उल्लेख केल्याचे समजते. पोलिसांनी हा मोबाईल जप्त केला असून, चिठ्ठीच्या आधारे पुढील कायदेशीर तपास सुरू केला असून अधिक तपास चालू आहे.
No comments:
Post a Comment