बारामती नगरपरिषदेच्या कामकाजाला पुन्हा वेग; निर्णयांपासून अंमलबजावणीपर्यंत सकारात्मक वाटचाल - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 4, 2026

बारामती नगरपरिषदेच्या कामकाजाला पुन्हा वेग; निर्णयांपासून अंमलबजावणीपर्यंत सकारात्मक वाटचाल

बारामती नगरपरिषदेच्या कामकाजाला पुन्हा वेग; निर्णयांपासून अंमलबजावणीपर्यंत सकारात्मक वाटचाल
बारामती :- बारामती नगरपरिषदेची नवनियुक्त बॉडी स्थापन झाल्यानंतर शहराच्या विकासकामांना अपेक्षित वेग मिळण्यास सुरुवात झाली होती. मात्र, अचानक घडलेल्या दुःखद घटनेमुळे संपूर्ण बारामती शोकमग्न झाली. त्यानंतर निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी आणि आचारसंहितेमुळे अनेक विकासकामांच्या गतीवर काही काळ परिणाम झाला.

आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून, आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष सचिनशेठ सातव, मुख्याधिकारी पंकज भुसे, सर्व समिती सभापती, नगरसेवक आणि नगरपरिषदेचे प्रशासन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा जोमाने कामाला लागले आहे.

नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, केवळ निर्णय घेण्यापुरते न थांबता सभेनंतर संबंधित कामांच्या अंमलबजावणीला तातडीने सुरुवात करण्यात आली असून आवश्यक निविदाही विलंब न लावता प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे नगरपरिषदेची कार्यक्षम आणि गतिमान कार्यपद्धती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

आजच्या वर्तमानपत्रात आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, बांधकाम तसेच नगरपरिषदेच्या स्थावर मालमत्तांच्या लिलावासंदर्भातील जाहिराती प्रसिद्ध झाल्या. यावरून नगरपरिषद घेत असलेले निर्णय केवळ कागदावर न राहता त्यांची प्रत्यक्ष आणि त्वरित अंमलबजावणी होत असल्याचे स्पष्ट दिसून येते.

नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होत असून, विकासकामांना नव्याने गती मिळत आहे. सकारात्मक दृष्टीकोन, तातडीचे निर्णय आणि प्रभावी अंमलबजावणी यांच्या जोरावर बारामती पुन्हा विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

*"बारामतीच्या विकासाचा वेग कायम राखणे, नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य देणे आणि नगरपरिषदेचे निर्णय तातडीने प्रत्यक्षात उतरवणे, हेच आमचे ध्येय आहे. आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांनी बारामतीला दिलेला विकासाचा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जयदादा पवार आणि पार्थदादा पवार यांच्या सातत्यपूर्ण लक्ष व सहकार्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकसंघपणे काम करत आहेत. नागरिकांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि विकासकामांची गतिमान अंमलबजावणी यावरच बारामतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमचा भर राहील."*
— सचिन सातव
नगराध्यक्ष, बारामती नगर परिषद

No comments:

Post a Comment