बारामतीत दुहेरी हत्याकांडामध्ये आरोपी नामे प्रमोद उर्फ पप्पु अंकुश पवार यांस जन्मठेपेची (सक्षम कारावासाची) सुनावली शिक्षा.
बारामती :- दिनांक ०२/०७/२०२६ रोजी बारामती येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश
१ मा. श्री. व्ही. सी. बर्डे साो. यांनी प्रमोद उर्फ पप्पु अंकुश पवार रा. सदगुरू कॉलनी
वेणुनगर, वाकडरोड, वाकड ता. हवेली, जि. पुणे. आरोपी याने एक महिला नामे मनिषा जाधव व एक पुरूष नामे गुलचंद निकम या दोघांचा खून केल्याप्रकरणी भा.द.वी. कलम ३०२ साठी जन्मठेपेची (सश्रम कारावास ) व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद तसेच भा. द. वी. कलम १७६ अन्वये सहा महिने
साधी कारावासाची तसेच भा.द.वी. कलम १७७ अन्वये सहा महिने साधा कारावासाची
शिक्षा ठोठावली आहे.थोडक्यात हकीकत अशी की, आरोपी नामे प्रमोद उर्फ पप्पु अंकुश पवार
यांनी महिला नामे मनिषा जाधव व एक पुरूष नामे गुलचंद निकम यांनी दि.३०/०७/२०२० रोजी गावमौजे खुटबाव ता. दौंड जि. पुणे. येथे दोघांच्या अनैतीक संबंधाच्या संशयावरून काठीने व कोयत्याने गंभीर स्वरूपाच्या जखमा करून खुन केला आहे. व आरोपी याने स्वतःचे खरे नाव लपवून तपासी अधिकारी यांना खोटे नाव सांगुन दोघांचा खुन केला आहे त्याबाबत फिर्यादी यांनी दि. ३१/०७/२०२० रोजी फिर्यादी पोपट बाबूराव कांबळे यांनी यवत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.
७४७/२०२० प्रमाणे भा. द. वी. कलम ३०२ तसेच भा. द.वी. कलम १७६, १७७ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता. सदर गुन्हयाचा तपास पुर्ण केल्यानंतर आरोपी विरूध्द मा.श्री. व्ही. सी. बर्डे साो. जिल्हा न्यायाधिश १ यांचे कोर्टात चार्जशिट दाखल करण्यात आले होते.सदर खटल्या कामी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनील ईश्वर वसेकर यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले. सदर खटल्यामधील प्रत्यक्ष घटना पाहणारी साक्षीदार नं. ८ बालाबाई देवीदास जाधव यांची साक्ष खटल्याकामी महत्वाची ठरली.
मे. कोर्टाने आरोपी याने सदर दोन्ही मयताला लोखंडी कोयत्याने व लाकडी काठीने
मारहाण करूण खून केला आहे. असे मत मे. कोर्टामध्ये व्यक्त केले आहे. तपासी
अधिकारी नामे बी. एन. पाटील यांची साक्ष नोंदवण्यात आली. सदर केसमध्ये फिर्यादी व
इतर साक्षीदार यांचे जबाब व सरकारी वकील अॅड. सुनील ईश्वर वसेकर यांनी
केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन मे. न्यायालयाने भा.द.वी. कलम जन्मठेपेची (सश्रम कारावास ) व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद तसेच भा.द.वी. कलम १७६ व १७७ अन्वये सहा महिने साधी कारावासाची
शिक्षा ठोठावली आहे.३०२ साठी सदर प्रकरणी यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष तासगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी श्री. सागर माने यांनी केस अधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे. तसेच त्यास पोलीस नाईक श्री. वेणूनाद ढोपरे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच कोर्ट पैरवी श्री. गोरख कसपटे व सहा,फौजदार श्री. ए. जी. कवडे यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणुन कामकाज पाहिले.
No comments:
Post a Comment