ISSE बारामती लोकल सेंटर व स्कॉन इन्फ्रा प्रीस्ट्रेस एलएलपी यांच्या संयुक्त विद्यमाने तांत्रिक कार्यक्रम संपन्न... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, August 2, 2026

ISSE बारामती लोकल सेंटर व स्कॉन इन्फ्रा प्रीस्ट्रेस एलएलपी यांच्या संयुक्त विद्यमाने तांत्रिक कार्यक्रम संपन्न...

ISSE बारामती लोकल सेंटर व स्कॉन इन्फ्रा प्रीस्ट्रेस एलएलपी यांच्या संयुक्त विद्यमाने तांत्रिक कार्यक्रम संपन्न...
बारामती:-  इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स, बारामती लोकल सेंटर (ISSE BLC) व **Scon Infra Prestress LLP** यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला *"Beyond Conventional Design: Innovative Applications of Prestress Technology"* हा तांत्रिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे तसेच ISSE च्या वरिष्ठ सदस्यांच्या हस्ते *मा. अजित दादा यांच्या प्रतिमेचे पूजन  व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर उपस्थितांचे स्वागत ISSE BLC चे अध्यक्ष **इंजि. गणेश नारुटे** यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते **इंजि. जयंत इनामदार** यांनी प्रीस्ट्रेस तंत्रज्ञानातील आधुनिक संकल्पना, त्याचे व्यावहारिक उपयोग आणि नाविन्यपूर्ण डिझाइन पद्धती याविषयी सखोल व मोलाचे तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच **इंजि. निरंजन काणे** यांनी *Product Presentation and Technical Information* या विषयावर प्रीस्ट्रेस तंत्रज्ञानाशी संबंधित उत्पादने व त्यांचे उपयोजन अतिशय सोप्या आणि प्रभावी भाषेत उपस्थितांना समजावून सांगितले.

या कार्यक्रमास **८० हून अधिक** स्ट्रक्चरल इंजिनिअर्स, बिल्डर्स, आर्किटेक्ट्स, अकॅडेमिशियन, अभियांत्रिकी विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन **डॉ. स्नेहल वाळके** यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी ISSE BLC चे सचिव **इंजि. मयूर ताडे** यांनी प्रमुख वक्ते, मान्यवर, प्रायोजक, उपस्थित सर्व सहभागी आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

सायंकाळच्या स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमामुळे उपस्थित अभियंते व विद्यार्थ्यांना प्रीस्ट्रेस तंत्रज्ञानातील आधुनिक संकल्पना आणि व्यावहारिक ज्ञानाची मौल्यवान माहिती मिळाल्याची भावना सहभागीांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment