उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांना संघटित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार; पुणे पूर्व शहरात संघटनात्मक विस्ताराचा कृती आराखडा निश्चित.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, November 14, 2026

उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांना संघटित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार; पुणे पूर्व शहरात संघटनात्मक विस्ताराचा कृती आराखडा निश्चित..

उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांना संघटित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार; पुणे पूर्व शहरात संघटनात्मक विस्ताराचा कृती आराखडा निश्चित..

पुणे : अजितपर्व उद्योजक संवाद यात्रेअंतर्गत आज शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पुणे पूर्व शहरातील उद्योग व व्यापार विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पक्षाचे नवनिर्वाचित उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. विवेक धुमाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी पुणे पूर्व शहर उद्योग व व्यापार सेलचे अध्यक्ष श्री. अंगद व्यास उपस्थित होते. पुणे पूर्व शहरातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्योग व व्यापार सेलची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्योग व व्यापार सेलची कार्यकारिणी स्थापन करणे, सुरुवातीचे उपक्रम व कार्यक्रम निश्चित करणे, संघटनात्मक कामासाठी ठोस कृती आराखडा तयार करणे, तसेच उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांना पक्षाच्या विचारांशी जोडण्यावर विशेष भर देण्यात आला.

याशिवाय औद्योगिक क्षेत्रातील संस्था, व्यापारी संघटना आणि व्यावसायिकांशी थेट संपर्क वाढवणे, त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेणे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.

उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांना संघटित करून त्यांच्या सक्रिय सहभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक सक्षम करणे, हा अजितपर्व उद्योजक संवाद यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. केवळ संघटनात्मक विस्तार न करता उद्योग व व्यापार क्षेत्रातील घटकांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

उद्योजक जोडूया, संघटना वाढवूया, पक्ष मजबूत करूया!

No comments:

Post a Comment