अंगावर थार घालून जीवे पोलिसाला मारण्याचा प्रयत्न; बारामती पोलिसांची अवघ्या ४ तासांत धडाकेबाज कारवाई,आरोपी जेरबंद! DYSP चैतन्य कदम यांच्या तत्पर नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक!
बारामती:- बारामती शहरातील सम्यक चौक येथे वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला थार वाहनाने धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना समोर आली. या घटनेमुळे पोलीस दलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून बारामती शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. उपलब्ध माहिती, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या चार तासांत संशयित आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. घटनेत वापरण्यात आलेली थार गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.
या संपूर्ण कारवाईत बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कार्यक्षमता कौतुकास्पद ठरत आहे.
कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा संदेश या घटनेतून देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment