**योद्धा @ ८० शॉर्ट फिल्म स्पर्धा शॉर्टफिल्म स्पर्धेचे आयोजन!** **आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचा उपक्रम**.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, November 13, 2020

**योद्धा @ ८० शॉर्ट फिल्म स्पर्धा शॉर्टफिल्म स्पर्धेचे आयोजन!** **आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचा उपक्रम**..

मुंबई दि.१२ नोव्हेंबर - देशाचे नेते, माजी केंद्रिय कृषीमंत्री, पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने ‘योद्धा@ ८० ’ शॉर्टफिल्म स्पर्धा २०२० आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली.


राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने राज्यभरात अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात.

‘योद्धा @ ८० - अजूनी चालतोची वाट' शॉर्टफिल्म स्पर्धा ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीची माहिती लघुपटाच्या माध्यमातून तरूण पिढीपर्यंत पोहोचावी व आताच्या काळातील फिल्म मेकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवक-युवतींकडून साहेबांच्या कारकिर्दीवर चांगल्या कलाकृतींची निर्मिती व्हावी, हा या स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश आहे. तसेच या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील कलावंत तरूण तरुणींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होऊन त्यांना आपले काम जगासमोर आणण्याची मोठी संधी या स्पर्धेच्या निमित्ताने मिळणार आहे.ट्रस्टच्या विश्वस्त खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म ठरणाऱ्या कलाकृतीस करंडक, प्रमाणपत्र तसेच रोख १,००,०००/- रुपये मिळणार आहेत.द्वितीय पारितोषिक करंडक, प्रमाणपत्र व रोख रुपये ७५,०००/- तर तिसरे पारितोषिक करंडक, प्रमाणपत्र व रोख रुपये ५०,००० असणार आहे.या पारितोषिकांव्यतिरिक्त पुढील पारितोषिके देखील दिले जातील.


अ) विशेष पारितोषिक (एकूण १२ ) :

विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई (एमएमआरडीए विभाग) विभागातील प्रत्येकी एका शॉर्टफिल्मला ज्युरी पसंतीचे विशेष पारितोषिक व याव्यतिरिक्त वरील ६ (सहा) विभागातील महिला दिग्दर्शकांच्या ६ निवडक शॉर्टफिल्मला विशेष पारितोषिक, प्रमाणपत्र व रु.१०, ००० रोख रकमेचे बक्षीस देण्यात येईल.

ब) विशेष पारितोषिक (एकूण २) :

वर नमूद केलेल्या महाराष्ट्रातील विविध विभागांच्या व्यतिरीक्त महाराष्ट्राबाहेरील प्रवेशिका असलेल्या एका शॉर्टफिल्मला ज्युरी पसंतीचे विशेष पारितोषिक तसेच एलजीबीटी घटकातील एका दिग्दर्शकास ज्युरी पसंतीने निवडलेले विशेष पारितोषिक, प्रमाणपत्र व रु.१०, ०००/- रोख रकमेचे बक्षीस देण्यात येईल.

क) प्रेक्षक पसंती पारितोषिक (एकूण ३ ) :
सुप्रिया सुळे या यूट्यूब चॅनेलवर सर्वाधिक लाईक्स मिळविणाऱ्या पहिल्या तीन शॉर्टफिल्मला विशेष पारितोषिक, प्रमाणपत्र व रु.१०, ०००/- रोख रकमेचे बक्षीस देण्यात येईल.

सदरील स्पर्धेचा निकाल आदरणीय शरदचंद्रची पवार साहेबांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त दिनांक १२ डिसेंबर २०२० रोजी जाहीर करण्यात येईल व नंतर पुढील काळात पारितोषिक विजेत्या सर्व शॉर्टफिल्मचे मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष स्क्रिनिंग करून पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

खालील विषयापैकी कोणत्याही एका विषयावर शॉर्टफिल्म तयार करणे अपेक्षित आहे.

१)महिला विकासात मा. शरद पवार साहेबांचे योगदान २) फुले-शाहू-आंबेडकर : पुरोगामी विचारांचे पाईक मा. शरद पवार साहेब ३)मा. शरद पवार साहेबांचे कृषी क्षेत्रातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय योगदान ४)महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात मा. शरद पवार साहेबांचे योगदान
५) कला-साहित्य-संस्कृती : रसिकाग्रणी मा. शरद पवार साहेब ६) क्रीडा क्षेत्राचे आधारस्तंभ : मा. शरद पवार साहेब ७) आपतकालीन नैसर्गिक प्रसंगातील संकटमोचक : मा. शरद पवार साहेब ८) महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील संस्थात्मक उभारणीचे आधारस्तंभ : मा. शरद पवार साहेब ९) लोक माझे सांगाती : मा. शरद पवार साहेब १० ) मा. शरद पवार साहेब : एक समग्रदर्शन

या स्पर्धेत जास्तीत जास्त ३ मिनिट कालावधीची शॉर्टफिल्म स्विकारली जाईल.चित्रपट निर्मात्यांनी/दिग्दर्शकांनी आपल्या शॉर्ट फिल्मच्या प्रवेशिका गुगल ड्राईव्ह लिंकसह सोबत दिलेल्या प्रवेशिका अर्जासोबत rwtshortfilm@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवाव्यात. प्रवेशिका अर्ज www.supriyassule.com व www.ncp.org.in या दोन्ही वेबसाईटवर डाऊनलोड करीता उपलब्ध आहेत.स्पर्धकांना दि.१२  नोव्हेंबर २०२० रोजीपासून ५ डिसेंबर २०२० पर्यंत शॉर्टफिल्म स्पर्धेकरिता पाठविता येतील.शॉर्टफिल्म दिग्दर्शकास वयाची कोणतीही मर्यादा नाही.

प्राप्त झालेल्या शॉर्टफिल्म प्राथमिक निवड प्रक्रियेमधून जातील आणि निवडलेल्या शॉर्टफिल्म सर्व जनतेसाठी सुप्रिया सुळे यु-ट्यूब चॅनेलवर(https://www.youtube.com/c/supriyasulencp) अपलोड केल्या जातील.

यास्पर्धेत शॉर्टफिल्म सादर करण्यासाठी प्रवेश फी असणार नाही.स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क : १) महेश हरबक - 9834602449 (२) सुबोध जाधव - 9823067879 (३) सागर राऊत - 7972937993 यांना संपर्क साधावा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई अध्यक्ष व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केलेले आहे.

No comments:

Post a Comment