बारामतीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार, 12 डिसेंबर रोजी पंचायत समिती व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वाद चिघळण्याची शक्यता. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 10, 2020

बारामतीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार, 12 डिसेंबर रोजी पंचायत समिती व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वाद चिघळण्याची शक्यता.

बारामतीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार, 12 डिसेंबर रोजी पंचायत समिती व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वाद चिघळण्याची शक्यता.
 
बारामती:- तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या मागणीसाठी बारामती पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. बारामती पंचायत समितीच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी तालुक्यातील सर्व स्तरातून होऊ लागले आहे.बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात असणाऱ्या ग्रामपंचायतीमधील सुमारे 500 हून अधिक कर्मचारी तुटपुंज्या पगारावर आपली सेवा बजावत आहेत. परंतु गेल्या दोन वर्षांपासून पंचायत समितीतील विस्तार दर्जाच्या काही मतलबी अधिकार यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित धूळखात पडून आहेत. या मागणीच्या पूर्ततेसाठी यापूर्वीही चार ते पाच वेळा कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते परंतु अधिकाऱ्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्याने त्यावेळेस माघार घेण्यात आली होती. परंतु अधिकाऱ्यांनी पुन्हा कर्मचाऱ्यांचे प्रश्न तसेच भिजत ठेवून त्यांची अवहेलना केल्याने कर्मचारी वर्गातून तीव्र संताप उमटला आहे.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत व त्यांच्या  न्याय व हक्कासाठी तालुका अध्यक्ष शहाबुद्दीन तांबोळी कारखेल, यांच्या बरोबर हंबीर जगताप जळगाव सुपे, कमल ताई जगताप बाबुर्डी व सुनिल लडकत बाबुर्डी हे चार कर्मचारी 10 डिसेंबर 2020 पासून आमरण उपोषणास बसले आहेत. या अमरण उपोषण पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला असून बारामती तालुक्यातील विविध संघटना व संस्थांनी मोठा पाठिंबा दिला आहे. बारामती सारख्या प्रगतशील तालुक्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी तालुकाध्यक्ष शहाबुद्दीन तांबोळी यांनी केली आहे.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित प्रश्नावर मार्ग न निघाल्यास 12 डिसेंबर या शरद पवारांच्या वाढदिवशी त्यांच्या घरावर उघडा मोर्चा काढणार असल्याचे संघटनेच्या सरचिटणीस ज्ञानोबा घोणे यांनी सांगितले. आज या उपोषणाचा दुसरा दिवस असून, आम्हाला योग्य न्याय मिळेपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असे उपोषण कर्ते याांनी सांगितले.या उपोषणास सत्त्याचा प्रहार जागतिक असंघटित कामगार कॉमन श्रमिक संघ यांनी जाहिर पाठींबा दिला आहे,या उपोषणावर तोडगा न निघाल्यास ग्रामपंचायत कर्मचारी व पंचायत समिती प्रशासनात मोठा वाद चिघळण्याची चिन्हे दिसू लागले आहेत.

No comments:

Post a Comment